उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उत्सुकता
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाण्यात ७५ जागा जिंकून एकहाती वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे महापौर शिवसेनेचाच होणार हे स्पष्ट असले, तरी आरक्षणाच्या चिठ्ठीमुळे कोणत्या चेहऱ्याला संधी मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आरक्षणाची सोडत जाहीर होताच शिवसेनेच्या गोटात हालचाली तीव्र झाल्या असून इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी पद्मा भगत, डॉ. दर्शना जानकर यांची नावे आता चर्चेत आली आहेत. दर्शना जानकर या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. पण, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
>> आठ ठिकाणी ओबीसी महापौर असणार
आजच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत ओबीसी प्रवर्गाातील नगरसेवक आठ ठिकाणी असणार आहेत. यामध्ये पनवेल, इचलकरंजी, अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव या महापालिकांचा समावेश आहे.
चक्राकार पद्धतीचा कोणाला फटका, कोणाला फायदा?
मंत्रालयात आज सकाळी ११ वाजता ही सोडत चक्राकार (Rotation) पद्धतीने काढण्यात आली. मागील काही वर्षांचे आरक्षण लक्षात घेता, यावेळी नवीन प्रवर्गाला संधी देण्यात आली आहे. यामुळे काही मातब्बर माजी महापौरांचे स्वप्न हुकले असले, तरी ५० टक्के महिला आरक्षणाने अनेक महिला नगरसेविकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कल्याण-डोंबिवलीत मोठी घडामोड....
कल्याण-डोंबिवली महापालिकेत बुधवारी मोठी घडामोड झाली. मनसेच्या ५ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिंदे गटाने मनसे आणि ठाकरेंच्या बंडखोरासह महापौरपदावर दावा केला. शिंदे गट-मनसेच्या या खेळीने युतीमधील भाजपचा गेम झाल्याची चर्चा आहे. भाजपने कल्याण-डोंबिवली महापालिकेत ५० जागा जिंकल्या आहेत. तर, शिंदे गटाने ५३ जागांवर विजय मिळवला. मनसेच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटाने भाजपकडून महापौर पदावर होणारा संभाव्य दावाच संपवून टाकल्याचे सांगण्यात येत आहे.
इतर संबंधित बातमी:
२९ महापालिकांचे 'कारभारी' ठरले! महापौरपदाचे आरक्षण जाहीर; पाहा तुमच्या शहरात कोणाची वर्णी?
