आयुष शर्मा असं या मुलाचं नाव आहे. भिवंडीत राहणारा आयुष नयावस्ती ग्लोरी इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत आहे. आयुष रविवारी 24 डिसेंबर रोजी क्रिकेट खेळताना पडला आणि त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली. त्याचे वडील राकेश शर्मा यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेला असता तेथील डॉक्टरांनी कळवा रूग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
advertisement
किरकोळ वाद, सलमानवर कोयत्याने वार; नववीच्या विद्यार्थ्याने शाळेत केला हल्ला
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या हाताची जखम स्वच्छ न करता, धनुर्वात इंजेक्शन न देता थेट प्लॅस्टर लावलं आणि शनिवारी येण्यास सांगितलं. परंतु शनिवारपूर्वीच आयुषच्या हाताची बोटं काळी-निळी पडली. भीतीपोटी राकेश यांनी पुन्हा कळवा रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी त्यांना उशीर झाल्याचे सांगत पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितलं. दरम्यान सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुषचा हात खांद्यापासून कापला कारण त्याला धनुर्वात झाला होता.
कळवा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या मुलाला हात गमवावा लागल्याचा आरोप आयुषचे वडील राकेश शर्मा यांनी केला आहे. याप्रकरणी राकेश शर्मा यांनी मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मदतीने आयुक्तांकडे धाव घेत न्याय मिळण्याची मागणी केली आहे. याबाबत ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी जेजे रुग्णालयामार्फत चौकशीचे आदेश दिले असून आठवड्याभरात पुन्हा याबाबत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं आहे. जर कळवा रूग्णालयाने मुलाच्या भविष्याचा विचार करून नुकसान भरपाई दिली नाही तर पुढे जाऊन मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा रवींद्र मोरे यांनी दिला आहे.
Shocking! नवरी होताच मृत्यूनं गाठलं! लग्नानंतर 18 तासांतच महिलेचा गेला जीव; धक्कादायक कारण
ठाणे महानगरपालिकेच्या कळवा हॅास्पिटलमध्ये भोंगळ कारभार अजूनही सुरुच आहे. काही तासातच 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा कळवा हॅास्पिटलच्या भोंगळ कारभारामुळे एका चिमुकल्याला आपला हात गमवावा लागला आहे.
