TRENDING:

Mumbai Water News: मुंबईकरांनो आता पाण्याचे 'नो टेन्शन', मुख्य धरणातील पाणीसाठ्यात वाढ

Last Updated:

मुंबईला शहराला मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा धरणांतून पाणीपुरवठा होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: मुंबई आणि ठाणे शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत भातसा धरणामध्ये यंदाच्या वर्षी पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे आता मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. शेतकऱ्यांना देखील यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांनो आता पाण्याचे 'नो टेन्शन', मुख्य धरणातील पाणीसाठ्यात वाढ
मुंबईकरांनो आता पाण्याचे 'नो टेन्शन', मुख्य धरणातील पाणीसाठ्यात वाढ
advertisement

मुंबईला शहराला मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा धरणांतून पाणीपुरवठा होतो. ठाण्याला देखील भातसा धरणातूनच पाणीपुरवठा केला जातो. सध्या भातसा धरणात 20 टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस पडत आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून धरणाचे पाच दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या भातसा धरणातून प्रति सेंकदाला 22.390 घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

advertisement

Pune Weather: विजा कडाडणार, पाऊस कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज

धरणातील पाणीसाठा वाढल्याने पाणी कपातीसह पाणी टंचाईच्या समस्येतून नागरिकांची सुटका होणार आहे. दोन शहरांची तहान भागण्यासह शेतीलाही मुबलक पाणी मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आजपर्यंत सरासरी 715.1 मिलीमीटर (84 टक्के) पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील अन्य शहरे आणि ठिकठिकाणच्या एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात गेल्यावर्षापेक्षा अधिक पाणीसाठा आहे. बारवी धरणात सध्या 95 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. मोडक सागर धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आता मुंबई तसेच ठाणेकरांची पाणी टंचाईची समस्या संपली आहे.

advertisement

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये राहणारे कोट्यवधी नागरिक भातसा धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून असतात. ठाणे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना देखील या धरणातील पाण्याचा उपयोग होतो. गेल्यावर्षी जुलैअखेर भातसा धरणात 8 टक्के म्हणजे 803.35 दस लक्ष घन मीटर साठा होता, तर बारवी धरणात 278.39 म्हणजे 82.16 टक्के पाणीसाठा होता.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Mumbai Water News: मुंबईकरांनो आता पाण्याचे 'नो टेन्शन', मुख्य धरणातील पाणीसाठ्यात वाढ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल