ठाणे : संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कोणत्या गावात किती जलस्त्रोत आहेत? हातपंप किती? विहिरी किती?, याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. पण त्यांना ही माहिती मिळत नाही. किंवा कुठे शोधावी, असाही प्रश्न पडतो. पण आता ही सर्व माहिती एका क्लिकवर आता तुम्हाला मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागामधील जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करून त्यांची अद्ययावत माहिती संकलित केली आहे.
advertisement
यामुळे आता घराजवळच्या हातपंपाची माहितीही एका क्लिकवर सहज उपलब्ध होणार आहे. याचा नक्कीच ग्रामीण भागातील नागरिकांना फायदा होणार आहे. त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही, असा विश्वास संबंधित यंत्रणेने व्यक्त केला आहे. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
दीड हजार गावांत 3 हजार जलस्त्रोत -
ठाणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात एक हजार 180 गावे आहेत. 431 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात असलेल्या या गावात किती जलस्त्रोत आहेत, ही माहिती 1180 IMIS Portal वर जिओ टॅगिंग करून निश्चित करण्यात आली आहे.
health tips in marathi : रात्री झोपण्यापूर्वी अजिबातच हे पदार्थ खाऊ नयेत, डॉक्टरांचं ऐकायला हवं
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जलस्त्रोतांची माहिती जिल्हा परिषदेने संकलित केली आहे. त्यामुळे गाव परिसरात किती जलस्त्रोत सक्रिय आहेत. त्यांची माहिती एका क्लिकवर म्हणजे mrsac.maharashtra.gov.in/smartvillage आणि ejalshakti.gov.in/imis - B-40 format या वेबसाइटवर सहज मिळणार आहे.