ठाणे : सध्या सर्वत्र उत्साहात लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. गणेशोत्सवात दररोज बाप्पाला गोडाचा नैवेद्य दाखवावा लागतो. कोकणात अनेक ठिकाणी गोडाचा नैवेद्य म्हणून गोड वडे बनवले जातात. आज आपण याची रेसिपी नेमकी काय आहे, हे जाणून घेऊयात.
गोड वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, गुळ आणि चवीपुरतं मीठ
advertisement
कृती -
सर्वप्रथम एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवावे आणि त्यात मीठ आणि गूळ घालून गुळ पूर्णपणे विरघळून घ्यावा. गुळ आणि पाणी मिक्स झाले की त्यानंतर त्यामध्ये गव्हाचे आणि तांदळाचे पीठ टाकावे. गव्हाचे आणि तांदळाचे पीठ टाकल्यानंतर हळूहळू ते पीठ उकडले की मग मिक्स करून घ्यायचे. पीठ आणि पाणी एकत्र झाल्यानंतर ते एका परातीमध्ये काढून घ्यावे. परातीत पीठ काढल्यानंतर गरम गरमच ते मळावे. थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून पुऱ्यांच्या आकाराचे करून घ्यावे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कारगिल युद्धाचा देखावा, पुण्यात कुठे पाहता येणार, हे आहे लोकेशन, VIDEO
वडे पातळ करावेत जेणेकरून तेलामध्ये ते व्यवस्थित तळून निघतील. गोळ्यांचे व्यवस्थित वडे तयार केल्यानंतर गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. अशा पद्धतीने आपले गोड वडे तयार आहेत. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या गणपती बाप्पासाठी नैवेद्य म्हणून हे गोड वडे देऊ शकता.