यानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवशी ठराविक प्रकाराचा सुका कचरा उचलण्यात येणार असून नागरिकांनी ठरलेल्या दिवसांप्रमाणे आपापल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून मगच कचरा देण्याचे आवाहन, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांनी केले आहे. तर ओला आणि घरगुती घातक सुका कचरा हा नेहमीप्रमाणे दैनंदिन उचलण्यात येणार असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.
advertisement
याखेरीज दररोजचा ओला कचरा वेगळा. त्यामुळे तुम्हाला आठ कचऱ्याचे डबे घरात ठेवावे लागणार. कचरा कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराने आतापर्यंत बुधवार व रविवारी गोळा केलेल्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे अपेक्षित होते. मात्र महापालिका प्रशासनाने करदात्या नागरिकांनाच वर्गीकरणाकरिता वेठीस धरले. कचरा संकलनाचे कंत्राट दिल्यापासून कल्याण डोंबिवलीत कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले.पूर्वी बुधवार आणि रविवार हे दिवस सुका कचरा संकलनासाठी निश्चित करण्यात आले होते. मात्र, काही भागांमध्ये या दिवशी कचरा देण्यात अनियमितता दिसून आल्याने सुधारित नियोजन करण्यात आल्याचे कोकरे यांनी सांगितले.
असे आहे सुका कचरा संकलनाचे नविन वेळापत्रक
1)सोमवार: प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या बाटल्या
2)मंगळवार: कागद, मॅगझिन, गत्ता
3)बुधवार: कागद, पुठ्ठा
4)गुरुवार: प्लास्टिक, प्लास्टिक भाग
5)शुक्रवार: ई-वेस्ट, धातू, स्विच, टायर
6) शनिवार: काच आणि काचेसंबंधी वस्तू
7)रविवार: कागद, पुठ्ठा
असे वर्गीकरण करून देणे अपेक्षित आहे. तसे केले नसल्यास कचरा उचलू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अनेकांना विघटनशील व अविघटनशील कचरा यातील भेदभाव समजत नाही
