फटाके विक्री नियमांचे उल्लंघन करणार्यांवर शासनाची कडक कारवाई
विनापरवाना फटाका विक्री केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच कर्णकर्कश आवाज करणारे फटाके विक्री करू नये. विनापरवानगी फटाके विकले जात असल्यास त्याविरोधात कारवाई होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मैदानांमध्येच फटाका विक्री केंद्र सुरू करण्यास परवानगी असली तरी काही ठिकाणी किराणा दुकानात फटाका विक्रीचे स्टॉल उभे राहू लागले आहे. अशा बेकायदा विक्री केंद्रांना राजाश्रय लाभत असल्याने आपसूकच अभय मिळत असल्याची चर्चा आहे.
advertisement
कल्याण तालुक्यात फटाक्यांचे स्टॉल रस्ते, पदपथावर मांडून काही ठिकाणी नियमांना तिलांजली मिळत असताना या शहरात रहदारी असलेल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर चौकांमध्ये हातगाड्यावर फटाके विक्री करून नियमांचे उल्लंघन केल्याचे चित्र दिसत आहे. फटाके विक्रीसाठी परवाना आवश्यक फटाक्यांची विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते. विनापरवाना फटाका विक्री केल्यास मोठा दंड ठोठावला जातो. किराणा, जनरल वा इतर दुकानांमध्ये फटाके विक्री अवैध आहे.
अर्ज कसा कराल?पालिकेची जी अग्निशमन केंद्रे आहेत त्याठिकाणी फटाका विक्री केंद्रासाठी अर्ज करावेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मंगळवारपासून फटाका विक्री केंद्र सुरू करण्यास ना हरकत दाखला देण्यास सुरुवात केली जाणार आहे. केवळ शहरातील मैदानांमध्येच फटाका विक्री केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली जात असून त्याच ठिकाणी विक्री करणे बंधनकारक असल्याचे अग्निशमन विभागाचे म्हणणे आहे.
नियम आणि अटी फटाके विक्रीसाठी लागू
फटाके विक्री केंद्र सुरू करण्याच्या परवानगीसाठी रीतसर अर्ज करणे आवश्यक असते. संबंधित यंत्रणेने परवानगी देताना दिलेला ना हरकत दाखला, जागेचा नकाशा, केंद्राच्या ठिकाणी अग्निशामन यंत्र आवश्यक. फटाके विक्री केंद्र हे मैदानांमध्येच मोकळ्या जागेत सुरू करावेत. आतापर्यंत १५० विक्रेत्यांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत.