पक्ष कोणी चोरला अशा आशयाचा बॅनर ठाकरे गटाचे केदार दिघ यांनी चार दिवसांपूर्वी लावला होता. यानंतर ठाण्यात केदार दिघे यांनी शिवसेनेला दिवट्या असून त्याचे उत्तर दिले जाणार असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान या बॅनरबाजीला शिवसेना बॅनर बाजीतून उत्तर दिलं. आज सकाळी ठाण्यातील हरी निवास सर्कल येथे शिवसेनेनं एक व्यंगचित्रात्मक बॅनर लावला.
advertisement
ठाकरेंनी घेतली आफ्रिकेत घोटाळा करणाऱ्यांची भेट; म्हस्केंचा आरोप; कोण आहेत गुप्ता बंधू?
बॅनरवर उद्धव ठाकरे हे दिल्लीत जाऊन सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासमोर लोटांगण घालत आहेत असं व्यंगचित्रात दाखवलं आहे. या व्यंगचित्रामुळे ठाण्यात ठाकरे गटाने संताप व्यक्त करायला सुरुवात केली. दरम्यान या पाठोपाठ शिवसेनेने आणखीन एक बॅनर लावला आहे. पक्ष कोणी विकला? खुर्चीसाठी पक्ष व विचारधारा आघाडीकडे घाण ठेवणाऱ्यांनी तत्वांच्या गोष्टी करू नये. शिवसेनेत विचारधारेची बांधिल आहे तो तुमचा नोकर नाही अशा पद्धतीचा आणखीन एक बॅनर पाण्यात लावण्यात आला.
दरम्यान, बॅनरबाजीमुळे ठाण्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सर्कल येथे रत्न लावलेला बॅनर जाऊन पाडला आहे. आता ठाण्यात बॅनर वरून राजकीय वर सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय. ठाकरे गटाने शिवसेनेचा बॅनर फाडून शिवसेनेला थेट आव्हानच दिले आहे. त्यामुळे आता शिवसेना याचे उत्तर कसे देते हे पहावं लागेल.
