TRENDING:

Thane : धक्कादायक! कामावरून घरी निघाली, त्याचवेळी आरोपीनं डाव साधला, ठाणे रेल्वे स्टेशनवर तरूणीसोबत नेमके काय घडले?

Last Updated:

crime news : ठाणे रेल्वे स्टेशनवरील एका भयंकर घटनेने सर्वांचा संताप उडाला आहे. नेमके काय घडले ते जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी एकदा वाचा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत दररोज लाखो लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. मात्र, या स्वप्नांच्या शहरात महिलांची सुरक्षितता हा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. गेल्या काही वर्षांत महिलांवरील अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा अनेक घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून आता पुन्हा एकदा ठाणे आणि मीरा रोड येथे घडलेल्या दोन भयानक प्रकारांमुळे शहर हादरुन गेले आहे.
obscene act on thane railway station and mira road
obscene act on thane railway station and mira road
advertisement

दोन दिवसांत घडलेल्या घटनेने सर्व हादरले!

पहिली घटना ठाणे रेल्वे स्थानकावर घडली आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे हे स्टेशन मुंबई आणि उपनगरांना जोडणारे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. दिवस-रात्र येथे हजारो प्रवासी गर्दी करताना दिसतात. परंतु अशा गजबजलेल्या ठिकाणी एका तरुणीसोबत विनयभंगाची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

advertisement

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार 28 ऑक्टोबर रोजी घडला. नेरूळहून एका कामानिमित्ताने ठाण्यात आलेली तरुणी ठाणे स्थानकाच्या मध्य पुलावरून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उतरत असताना, आधीपासून तिथे असलेल्या एका विकृत तरुणाने तिचा विनयभंग केला. तरुणीने क्षणाचाही विलंब न लावता ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला काही वेळातच अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रवासी महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

advertisement

दुसरी घटना - मिरा रोड हादरलं!

मुंबईच्या उपनगरातील मीरा रोड परिसरात आणखी एक संतापजनक प्रकार घडला आहे. नया नगर भागात 43 वर्षीय महिलेला 40 वर्षीय झहीर खान या व्यक्तीने व्यक्तीने त्रास दिला. मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिलेने नरेंद्र पार्कपासून मिरा रोड रेल्वे स्टेशनकडे जाण्यास सुरुवात केली असता झहीर खान तिचा सतत पाठलाग करत होता. केवळ पाठलागच नाही, तर त्या महिलेला 'तुझी फील्डिंग लावतो' अशी अश्लील धमकी देत तिची मानसिक छळवणूकही केली.

advertisement

या घटनेनंतर महिलेनं थेट नया नगर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी झहीर खानविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकारानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा पुढे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1 की 2 नोव्हेंबर, कोणती एकादशी धरायची? तुळशी विवाहाचे दिवस, मुहूर्त आणि महत्त्व
सर्व पहा

या दोन घटनांनी पुन्हा एकदा मुंबईसारख्या महानगरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आणला आहे. गर्दीच्या रेल्वे स्थानकांपासून ते गजबजलेल्या रस्त्यांपर्यंत महिलांना सुरक्षित वाटेनासे झाले आहे. पोलीस यंत्रणा गस्त वाढवूनही असे प्रकार थांबत नसल्याचं चित्र दिसत आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये वाढत्या अशा घटनांमुळे नागरिकांनी आणि प्रशासनाने गंभीर पातळीवर चर्चा करून ठोस पावलं उचलणं अत्यावश्यक झालं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane : धक्कादायक! कामावरून घरी निघाली, त्याचवेळी आरोपीनं डाव साधला, ठाणे रेल्वे स्टेशनवर तरूणीसोबत नेमके काय घडले?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल