शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौक परिसरातील वाहतूक बंद राहणार आहे. या काळात वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाचे वरिष्ठ, मेट्रो, डीएफसीसी विभागाचे अधिकारी यांची नुकतीच बैठक झाली. लोढा पलावा येथील एका शाळेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत वाहतुकीचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. शिळफाटा रस्ता बंदचा प्रवाशांना त्रास होऊ नये. तसेच पर्यायी रस्ते मार्गावरील वाहतूक नियोजनावर देखील चर्चा झाल्याचे सांडभोर यांनी सांगितले.
advertisement
Navi Mumbai Metro: नवी मुंबई मेट्रो सुस्साट! अर्ध्या तासांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत
वाहतूक नियोजनासाठी पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, कल्याणचे साहाय्यक पोलीस आयुक्त, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, कोळसेवाडी, डोंबिवली वाहतूक विभागाचे सर्व कर्मचारी, अधिकारी 5 दिवस स्वत: तैनात असणार आहेत. तसेच शिळफाटा वाहतूक बंदीचा कोणाही प्रवाशाला वाहतूक कोंडीच्या माध्यमातून त्रास होऊ नये याची काळजी घेणार आहेत.
कसा असेल वाहतूक बंदोबस्त?
शिळफाटा रस्त्यासह संलग्न पर्यायी 8 ते 10 मार्गांवर वाहतूक पोलीस आणि अधिकारी दिवस, रात्र तैनात असणार आहेत. पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट स्वत: वाहतूक नियोजनावर लक्ष ठेवणार असून एक साहाय्यक पोलीस आयुक्त, एक पोलीस निरीक्षक, 8 पोलीस उपनिरीक्षक, 60 अंमलदार, पुलाचे काम करणाऱ्या टाटा कंपनीकडून 60 वाहतूक सेवक उपलब्ध होणार आहेत. यातील 30 वाहतूक सेवक कोळसेवाडी, तर 30 मुंब्रा वाहतूक हद्दीत तैनात असणार आहेत. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कादबाने यांच्यासह मानपाडा पोलीस वाहतूक नियोजनावर लक्ष ठेवणार आहेत. तसेच 5 पोलीस उपनिरीक्षक बंदोबस्तासाठी बाहेरून मागविले जाणार आहेत.
बंदोबस्ताची ठिकाणे
शिळगाव-आगासन फाटा, डोंबिवली माणकोली पूल, नेवाळी नाका, काटई चौक, खोणी गाव तळोजा रस्ता, कल्याण फाटा या ठिकाणी बंदोबस्त असणार आहे. पुढील 5 दिवस वाहतूक शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. जड, अवजड वाहन चालकांनी शिळफाटा सोडून बाहेरील महामार्ग आमि रस्त्यांचा अवलंब करावा, असं आवाहन सांडभोर यांनी केलंय.