TRENDING:

महिनाभरात तयार होतात 5 हजार मोदक, ठाण्यातील महिलेमुळे अनेकांना मिळाला रोजगार, VIDEO

Last Updated:

संकष्टी, अंगारकी चतुर्थी आणि गणेशोत्सवात महिनाभर या सगळ्या जणी मिळून उकडीचे मोदक बनवतात. त्यांच्या मोदकांना फक्त ठाणे मुंबईतच नव्हे तर परदेशातसुद्धा मोठी मागणी आहे. हे सर्व मोदक या सगळ्या महिला हाताने बनवतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी
advertisement

ठाणे : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाला उत्साहात अशी सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवात गणपती बाप्पाला आणि त्याचसोबत आपल्या सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. ठाण्यातील मंगल देशमुख यांच्याकडील उकडीचे मोदक हे संपूर्ण ठाण्यात प्रसिद्ध आहेत. ठाण्यातील मंगल देशमुख या 60 वर्षीय महिला 2002 पासून आपला उकडीच्या मोदकांचा व्यवसाय करत आहेत. या व्यवसायावरच त्यांनी त्यांच्या चारही मुलांचे पालनपोषण केले.

advertisement

मंगल या फक्त एकट्या हा व्यवसाय करत नाहीत तर त्यांच्या या व्यवसायामुळे ठाण्यातीलच दहा ते बारा महिलांचा रोजगार मिळत आहे. संकष्टी, अंगारकी चतुर्थी आणि गणेशोत्सवात महिनाभर या सगळ्या जणी मिळून उकडीचे मोदक बनवतात. त्यांच्या मोदकांना फक्त ठाणे मुंबईतच नव्हे तर परदेशातसुद्धा मोठी मागणी आहे. हे सर्व मोदक या सगळ्या महिला हाताने बनवतात.

advertisement

दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण व महाआरती, 35 हजार महिलांच्या उपस्थितीत अद्भुत कार्यक्रम, video

काय म्हणाले मंगल देशमुख -

'मी 2002 पासून मोदकांचा व्यवसाय करत आहे. माझे पती गेल्यानंतर या व्यवसायानेच मला पुन्हा उभं राहण्याचं बळ दिलं. आमची खानावळ सुद्धा आहे. परंतु या गणेशोत्सवाच्या दिवसात मोदकांचा व्यवसाय जास्त असल्यामुळे ती आम्ही बंद करतो. एका महिन्यात साधारण आम्ही 5 हजार मोदकांची विक्री करतो, ' असे उद्योजिका मंगल देशमुख यांनी सांगितले.

advertisement

सोलापुरातील ग्रामीण भागातल्या तरुणाची कमाल, महिन्याला कमावतोय 50 हजार रुपये, VIDEO

महिनाभरात 5 हजार मोदकांचा व्यवसाय करणे सोपी गोष्ट नव्हे. मंगला देशमुख यांच्यामुळे अनेक स्त्रियांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ठाण्यात गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक विषय निघाला की मंगला देशमुख यांचे नाव आपसूकच समोर येते, इतके हे समीकरण घट्ट झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
महिनाभरात तयार होतात 5 हजार मोदक, ठाण्यातील महिलेमुळे अनेकांना मिळाला रोजगार, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल