दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण व महाआरती, 35 हजार महिलांच्या उपस्थितीत अद्भुत कार्यक्रम, video
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पारंपरिक वेशात मध्यरात्री 1 वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेशनामाचा जयघोष करीत अथर्वशीर्षासोबत महाआरती केली.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पुण्यातील दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. आज ॠषिपंचमीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे हजारो महिलांनी सामुदायिकरीत्या दगडूशेठ गणपतीसमोर अर्थवशीर्ष पठण केले. 'ओम नमस्ते गणपतये नमः, मोरया, मोरया...' च्या जयघोषाने तब्बल 35 हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठण करत गणरायाला अभिवादन केले.
advertisement
पारंपरिक वेशात मध्यरात्री 1 वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेशनामाचा जयघोष करीत अथर्वशीर्षासोबत महाआरती केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मनाला शांततेची अनुभूती देणारा ओंकार जप, गणेश जागर गीत आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करत, महिलांनी हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन केले.
advertisement
गणेशनामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डने घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केल्याचे दिसून आले.
advertisement
राज्यात आज अनेक ठिकाणी होणार जोरदार पाऊस, IMD कडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आवाहन
भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. या उपक्रमात पुण्यासह मुंबई, लातूर, कोल्हापूर, नाशिक आणि महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी सहभाग घेतला. उपक्रमाचे हे 39वे वर्ष आहे.
मांगल्य वाढावं आणि घरातील भगिनींना या उत्सवात सहभागी करून घ्यावे, या उद्देशाने ही सामूहिक अथर्वशीर्ष पठणाची कल्पना पुढे आली. दगडूशेठच्या येथे 11 भगिनीपासून सुरू झालेला उपक्रम आज 35 हजार भगिनीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे या उत्सवाला एक मांगल्य आणि पावित्र्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे, अशी भावना ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 08, 2024 11:43 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण व महाआरती, 35 हजार महिलांच्या उपस्थितीत अद्भुत कार्यक्रम, video