सदरचे काम 24 तासांचा शटडाऊन घेऊन करण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 9.00 ते बुधवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 9.00 वा. पर्यत बंद राहणार आहे. तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्या टप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
advertisement
Aloo Bukhara Benefits: पचनशक्तीसाठी अतिशय फायदेशीर, आलू बुखाराचे हे गुणकारी फायदे माहितीये का?
या कालावधीमध्ये घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, डोंगरीपाडा, वाघबीळ, इत्यादी ठिकाणाचा पाणी पुरवठा मंगळवार दि .22 जुलैपासून सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजे पर्यंत बंद राहील. समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या आणि मुंब्राचा काही भाग मंगळवार दि. 22 जुलै रोजी रात्री 9.00 ते सकाळी 9.00 वा. पर्यंत बंद राहील. अश्या रीतीने टप्या टप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
