Aloo Bukhara Benefits: पचनशक्तीसाठी अतिशय फायदेशीर, आलू बुखाराचे हे गुणकारी फायदे माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Aloo Bukhara Benefits: फळांमधून आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, अँटिऑक्सिडंट, मिनरल्स हे घटक भेटत असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
छत्रपती संभाजीनगर : जसा ऋतू बदलतो तसा फळ देखील बदलत असतात. ज्या ऋतूमध्ये जे फळ असतात ते खाणे आपण गरजेचे असते. कारण की फळांमधून आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, अँटिऑक्सिडंट, मिनरल्स हे घटक भेटत असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आलू बुखारा हे फळ विक्रीसाठी आले आहे. तर या फळाचे काय फायदे होतात? याविषयी माहिती जाणून घेऊयात.
advertisement
आलू बुखाऱ्यात भरपूर फायबर असल्याने पचनशक्ती सुधारते. ज्यांना वारंवार पचनाच्या तक्रारी होतात, त्यांच्यासाठी हे नैसर्गिक उपाय म्हणून उपयुक्त आहे. आलू बुखाऱ्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन K चांगल्या प्रमाणात असल्याने हाडं मजबूत राहतात. वृद्ध वयात होणाऱ्या हाडांच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी आलू बुखारा उपयोगी ठरतो. या फळामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी फायदेशीर ठरतात. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत होते आणि हृदयविकाराच्या धोक्यापासून संरक्षण मिळतं.
advertisement
आलू बुखाऱ्यामध्ये लोह (Iron) असल्याने ते हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतं. त्यामुळे अशक्तपणा जाणवत असल्यास किंवा रक्ताची कमतरता असल्यास याचा आहारात समावेश फायदेशीर ठरतो. अँटीऑक्सिडंट्सच्या आधारे हे फळ त्वचेला नैसर्गिक तजेला देतं. त्वचेवर लवकर वृद्धत्वाचे परिणाम दिसू नये यासाठी याचे नियमित सेवन केलं जातं. यामध्ये असणारं व्हिटॅमिन A डोळ्यांसाठी फायद्याचं असतं. त्यामुळे दृष्टिदोष टाळण्यासाठी याचा उपयोग होतो. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह असणाऱ्यांसाठी हे फळ सुरक्षित मानलं जातं. दररोज 3 ते 4 आलू बुखारे पुरेसे ठरतात. याचे जास्त सेवन केल्यास जुलाब, पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होऊ शकते.
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 19, 2025 10:32 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Aloo Bukhara Benefits: पचनशक्तीसाठी अतिशय फायदेशीर, आलू बुखाराचे हे गुणकारी फायदे माहितीये का?