ठाणे : LCHF (फॅटी-प्रोटीन) आहार हा एक समतोल आहार आहे. मात्र, आपली भारतीय खाद्यसंस्कृती ही कार्बोदकेयुक्त आहाराची आहे. आता ती बदलणं हे इतक्या सहजा-सहजी होणार नाही. मात्र, जर आपण त्यामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन समजावून घेतला तर गोष्टी नक्कीच सोप्या होतील. वाढतं वजनं, शुगर तसेच हार्ट संबंधित असणारे अनेक प्रॉब्लेम यावर LCHF प्रोटीन हा एक उत्तम आहार आहे.
advertisement
कार्बोदकेयुक्त आहारामुळे वजन वाढते, म्हणजे अधिक चरबी ही शरीरात साठवली जाते. स्निग्ध पद्धार्थ आणि शरीरातील अतिरिक्त चरबी ह्यांचा काहीही संबंध नाही. आहारातून घेतलेलं फॅट आणि शरीरातील फॅट ह्यात प्रचंड तफावत आहे. दरम्यान रोज किती प्रमाणात कार्बोदके खायला हवे, लो कार्ब हाय फॅट आहार नेमका कोणता, त्यानंतर या आहारामध्ये डायटरी फॅट्स नक्की कोणते?, फॅटी प्रोटीन आहार घेणे फायद्याचं का आहे? तसेच या आहारपद्धतीचा दैनंदिन जीवनात अवलंब कसा करायचा याबाबत माहिती जाणून घेण्यसाठी लोकल18 च्या टीमने आहारतज्ञ डॉ. आरती भगत यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत संपूर्ण माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना आहारतज्ञ आरती भगत म्हणाल्या की, हे जे LCHF डायेट आहे ते हार्ट प्रॉब्लेम, ज्यांना शुगर आहे, वाढत्या वजनावर तर ज्यांना फिट्स येतात, अशा व्यक्तींसाठी उत्तम डाएट ठरू शकतं. या डाएटमध्ये हेल्थी फॅट्स असलेल्या पदार्थांचा खाण्यात अवलंब करावा लागतो. जसे की बदाम ,अक्रोड, हिरव्या भाज्या. तसेच या डाएटमध्ये शक्यतो चपाती, भात हे कमी करायचं आहे. भात तर, शक्यतो बंद केला तर लवकर याचे फायदे दिसून येतात. तसेच प्रोसेस फूड कमी करायचे आहेत ज्यात शुगर जास्त असते. यासोबतच हे डाएट आहारतज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली घ्यावे, अन्यथा चुकीच्या डायेटमुळे वजन वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
LCHF (फॅटी प्रोटीन) आहार घेणे फायद्याचं का आहे? -
- इन्सुलिनची प्रतिकार क्षमता कमी करते.
- एचडीएल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.
- शरीरातील ऊर्जा पातळी दीर्घकाळ टिकून ठेवते.
- स्नायू बळकट होतात.
- वजन कमी करण्यास मदत होते.
- त्वचा तुकतुकीत आणि हायड्रेटेड राहते.
- अचानक रक्तात ग्लुकोजची वाढ होत नाही, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
निरोगी आयुष्यासाठी डायटरी फॅट्सही तितकेच महत्त्वाचे असतात. तर मग हे डायटरी फॅट्स पुढीलप्रमाणे -
पनीर, गाईचं साजूक तूप, लोणी, ऑलिव्ह ऑइल, नारळाचे खाद्यतेल, नट्स (बदाम, काजू, अक्रोड, ई), क्रीम (साय), अंडं (पिवळा भाग )
LCHF आहारात आपण अंदाजे 100 ग्रॅम कार्बोदकांचे सेवन केले पाहिजे. हा आहार नक्कीच भविष्यातील पोषण आहार असणारे आहे यात शंका नाही. तसेच LCHF (फॅटी-प्रोटीन) ही आहारपद्धत शरीराला पूरक तर असतेच पण सोबतच शरीराला योग्य ते पोषण मिळतं. त्यामुळे आपली दैनंदीन जीवनातील खाद्य शैली थोड्या-फार फरकानं बदलण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या आरोग्यावर होणार परिणाम हे नक्कीच आरोग्यदायी असतील.
Disclaimer: (या बातमीत दिलेल्या माहिती ही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या चर्चेच्या आधारावर आहे. ही सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तिगत सल्ला नाही. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही औषधी घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सदरील बातमीतील मतांशी लोकल18 सहमत नसून जबाबदार नसेल)