TRENDING:

फरसाणपासून ते वेफर्सच्या अनेक व्हरायटी, 10 रुपयांपासून करा खरेदी, दिव्यात फेमस आहे दुकान

Last Updated:

दिवा शहरात बारा वर्षांपूर्वीच मोहम्मद सिद्दकी कृपा बेकरी नावाच दुकान आहे. खास करून मोहम्मद यांचे दुकान केळ्याच्या वेफर्सच्या व्हरायटीसाठी प्रसिद्ध आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी 
advertisement

ठाणे : अनेकजण व्यवसाय सुरू करतात पण काही कारणास्तव मध्येच बंद करतात. परंतू दिवा शहरात बारा वर्षांपूर्वीच मोहम्मद सिद्दकी कृपा बेकरी नावाच दुकान आहे. बारा वर्षांपासून मोहम्मद हे ही बेकरी चालवत आहेत. या बेकरीमध्ये नमकीन, फरसाण, बटर, खारी, वेफर्स, चकली, साधे पाव, कडक पाव या सगळ्या गोष्टी मिळतात. खास करून मोहम्मद यांचे दुकान केळ्याच्या वेफर्सच्या व्हरायटीसाठी प्रसिद्ध आहे.

advertisement

दिवा स्टेशन पासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या या दुकानामध्ये केळ्यांचे वेफर सोबतच बटाट्याचे वेफर्स, शेजवान चकली, चणे, शेंगदाणे, गोड चिवडा हे सगळं अगदी फ्रेश मिळते आणि यांची प्राईज सुद्धा अगदी कमी आहे. जर तुम्हाला अर्धा किलो पाव किलो अशा पद्धतीने हे पदार्थ घ्यायला जमत नसतील तर तुम्ही या दुकानातून फक्त  10 किंवा 20 रुपयांना सुद्धा वेफर्स, नमकीन आणि फरसाण विकत घेऊ शकता.

advertisement

famous medu vada : स्वस्तात मस्त नाश्ता, चवही भारी, मेदूवड्याला तर लोकांची खूपच पसंती, हे आहे लोकेशन

जॉब मिळत नसल्या कारणाने मोहम्मद सिद्धकी यांनी घरातल्यांच्या पोट्या पाण्याचा प्रश्नामुळे या श्रीकृपा बेकरीला बारा वर्षांपूर्वी सुरुवात केली. त्यावेळेला लोकांना हे दुकान माहित नसल्यामुळे धंदा व्यवस्थित चालायचा नाही, खर्च सुद्धा निघायचं नाही. परंतु , आता परिस्थिती बदलली आहे त्यांच्या श्रीकृपा बेकरीत आता कायमच गिऱ्हाईकांची गर्दी असते. त्यांच्या इथे मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी या चांगल्या क्वालिटीच्या असल्यामुळे लोकांना आवडतात.

advertisement

अशी आहे कल्याणच्या प्रसिद्ध अंबर वडापावची कहाणी!, रोजची विक्री पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

'व्यवसायला सुरुवात करण्या अगोदर जॉब करण्याचा विचार केला परंतू तो न मिळाल्याने मी बेकरी सुरु केली. दिव्यात अनेक ठिकाणी बेकरी असली तरीही माझ्या दुकानात सगळ्यांपेक्षा 2 रूपये कमीच किंमत असते.' असे बेकरीचे मालक मोहम्मद सिद्दकी यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
फरसाणपासून ते वेफर्सच्या अनेक व्हरायटी, 10 रुपयांपासून करा खरेदी, दिव्यात फेमस आहे दुकान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल