सातवा निजाम मीर उस्मान अली खान याने 'मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' हा राजकीय पक्ष काढला होता. या निजामाने 37 वर्षे राज्य केलं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये एमआयएम हा पक्ष धार्मिक अस्मितेसाठी ओळखला जात होता. बहादूर जन या संघटनेचे प्रमुख होते. त्यांच्या काळामध्येच कासिम रझवीचा उदय झाला. संघटनेचे प्रमुख निवृत्त झाल्यानंतर कासिम रझवीने पक्षाचा कारभार आपल्या ताब्यात घेतला.
advertisement
Marathwada Weather: विजा कडकडणार, पाऊस कोसळणार, मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांना अलर्ट
कासिमला तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता. ही बाब निजामाने हेरली. आपल्याविरुद्ध सुरू असलेलं जनआंदोलन चिरडण्यासाठी आपल्याला एमआयएमचा उपयोग होईल, हे निजामाच्या लक्षात आलं. त्याने कासिम रझवीला बळ देण्यास सुरुवात केली. या बाळाचा गैरवापर करत कासिम रझवीने शेवटच्या टप्प्यामध्ये एक रझाकार संघटना उभी केली. या संघटनेकडे, निजामापेक्षा जास्त 2 लाख फौज होती. या फौजेने महिला आणि लहान मुलांवर अत्याचार करायला सुरुवात केली. त्यामुळे आंदोलन चिघळलं. शेवटी मराठवाड्यातल्या जनतेला देखील हातात शस्त्रं घ्यावी लागली.
तेव्हाचा एमआयएम पक्ष आणि सध्याच्या एमआयएमच्या नावामध्येच फरक आहे. 'मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' हे तत्कालीन नाव होतं. सध्याच्या एमआयएमचं नाव 'ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' हे नाव आहे. हा पक्ष आता देशव्यापी झालेला आहे. मात्र, दोन्हींचा पाया एकच आहे. दोन्ही पक्ष धार्मिक आधारावर आहेत. आजही एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ध्वजारोहणाला येत नाहीत, अशी माहिती अभ्यासक सारंग टाकळकर यांनी दिली.