या उपक्रमाअंतर्गत 75 भिक्षूंना अभ्यंगस्नान टॉवेल, बनियान, टोपी, शर्ट, विजार, तेल, साबण, उटणे, चिवडा, लाडू, शंकरपाळी,मिठाईचे बॉक्स वाटप करण्यात आले. तसेच 1 हजार निराधार महिलांना साडी वाटप, 250अनाथ मुलांना नवीन कपडे वाटप करण्यात आहे. हा कार्यक्रम सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती येथील अथर्व गार्डनमध्ये पार पडला. याशिवाय अंध, अपंग, कुष्ठरोग वसाहतीतील महिला व एचआयव्हीग्रस्त महिला व पूरग्रस्त नागरिकांनाही फराळ वाटप करण्यात आले.
advertisement
दिवाळी हा सण आनंदाचा आणि प्रेमाचा सण असून वंचिता सोबत साजरी केल्यानेच त्याचा खरा अर्थ पूर्ण होतो असे आस्था रोटी बँक संस्थेचे संस्थापक विजयकुमार चंचुरे यांनी सांगितले. भिक्षुकांना भूमापन अधिकारी गजानन पोळ, बीएसएनएल मुंबईचे वरिष्ठ अधिकारी अमित कांबळे, लायन्स क्लब मेंबर स्वामीनाथ कलशेट्टी व इतर मान्यवरांच्या हस्ते अभ्यंगस्नान घालून फराळ वाटप करण्यात आले. वंचितांनाही दिवाळी सणाचा आनंद मिळावा याच उद्देशाने गेल्या 11 वर्षापासून असता रोटी बँक हा कार्य करत आहे. हे कार्य करत असताना निराधार महिलांच्या व भिक्षुकांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून आनंद मिळतो हे मात्र नक्की.