मयुरी चव्हाण, अनिल चौधरी आणि रेशंता सोनवणे या तीन शिंदे गटाच्या उमेदवारांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी आणि जामनेर नगर परिषदेच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या उपस्थितीत तीनही माघार घेणाऱ्या उमेदवारांनी भाजपात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
खरं तर, मागील काही काळापासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. भाजपने मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील अनेक माजी नगरसेवक आपल्या गळाला लावले होते. यामुळे एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीला जात गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली होती.
अशात गिरीश महाजन यांनी जामनेरमध्ये एकनाथ शिंदेंना दुहेरी धक्का दिला आहे. त्यांनी शिंदेंच्या तीन उमेदवारांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावून त्यांचा भाजपात प्रवेश करवून घेतल्याची चर्चा आहे. महाजनांच्या या खेळीमुळे एकनाथ शिंदे चेकमेट झाले आहेत. शिंदे गटाच्या उमेदवारांनी निवडणूक न लढवता भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
