याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एल्फिन्स्टन पुलामुळे परळ आणि प्रभादेवी परिसर एकमेकांशी सव्वाशे वर्षांहून जास्त काळापासून जोडले गेले होते. लोअर परळ परिसरात सरकारी रुग्णालये, शाळा, महाविद्यालये यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर, प्रभादेवी परिसरात हॉटेल्स, मॉल्स आणि बाजारपेठा आहेत. परळ स्थानकावर उतरून प्रभादेवी पुलाचा वापर करून दोन्ही दिशेला जाणे नागरिकांसाठी सोपं होतं. आता मात्र त्यांची मोठी गैरसोय होणार आहे.
advertisement
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वादळी पाऊस, 48 तास महत्त्वाचे, पुण्यासह 5 जिल्ह्यांना अलर्ट
शिवाय, टिळक आणि करी रोड पुलांवरील वाहनांची संख्या नेहमीपेक्षा चौपट झाली आहे. या दोन्ही ठिकाणी वाहनांची गर्दी नियंत्रण करताना वाहतूक पोलिसांची मोठी तारांबळ उडाल्याचं दिसलं. उपनगरातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत प्रभादेवी पुलावरून केईएम, वाडिया, टाटा या रुग्णालयांत जाणं सोपं पडत होतं. आता याच अंतरासाठी दादरच्या टिळक पूल किंवा करी रोड पुलाचा वापर करून अर्धा पाऊण तास खर्च करून वळसा मारावा लागणार आहे.
'अटल सेतू'वरून आलेल्या वाहनांना विनाअडथळा थेट वरळी आणि तेथून पुढे दक्षिण मुंबई, तसेच वांद्र्याला जाता यावं यासाठी 'एमएमआरडीए'कडून 4.5 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग उभारला जाणार आहे. सध्याच्या पुलाच्या जागी स्थानिक वाहतुकीसाठी पुलाची उभारणी करून, त्यावरून वरळी-शिवडी मार्ग जाणार आहे.