TRENDING:

Pune News : हॉटेलनंतर आता मॉलमध्येही ड्रग्ज; दोन पुणेकर तरुणी Drugs ओढताना सापडल्या

Last Updated:

पुण्याच्या एफसी रोडवरील हॉटेलमधला ड्रग्जचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यातूनच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुणी ड्रग्ज सेवन करताना दिसत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वैभव सोनवणे, प्रतिनिधी
हॉटेलनंतर आता मॉलमध्येही ड्रग्ज; दोन पुणेकर तरुणी Drugs ओढताना सापडल्या
हॉटेलनंतर आता मॉलमध्येही ड्रग्ज; दोन पुणेकर तरुणी Drugs ओढताना सापडल्या
advertisement

पुणे : पुण्याच्या एफसी रोडवरील हॉटेलमधला ड्रग्जचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यातूनच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुणी ड्रग्ज सेवन करताना दिसत आहेत. पुणे नगर रस्त्यावरील फोनिक्स मॉलमधील हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागलं आहे. टॉयलेटमध्ये या दोन तरुणी ड्रग्ज सदृष्य पदार्थ घेताना दिसत आहेत.

advertisement

दुसरीकडे रविवारी समोर आलेल्या व्हिडिओनंतर पुण्यात ड्रग्जच्या मुद्यावरून पुन्हा वातावरण तापलंय. ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षकासह चौघांना निलंबित करण्यात आलंय.

एफसी रोडवरील बारमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्यरात्री सुरू असलेले पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला. हजारो रुपये खर्च करून आणि नियमांचं उल्लंघन करून पार्ट्या सुरू आहेत. पोर्शे कार प्रकरणानंतरही प्रशासनानं कोणताही धडा घेतला नसल्याचं स्पष्ट झालंय. पोर्शे प्रकरणातही बारनं वेळ पाळली नसल्यामुळे दोघांना जीव गमवावा लागला होता. दोघांनी जीव गमावल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली होती. मात्र त्या कारवाईचा जोर काही टिकला नाही. कारण रात्री-अपरात्री बार आणि पब्ज सुरूच आहेत. इतकंच नव्हे तर तिथे अंमली पदार्थही मिळत आहेत.

advertisement

पार्टीत ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओच प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेटजवळ बसून तरुण ड्रग्ज घेत असल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्याकडील हे ड्रग्ज मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलंय. पार्टी करणाऱ्या ग्रुपनं जेवण आणि दारूवर अवघ्या काही तासात तब्बल 80 ते 85 हजार खर्च केले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांना दिलासा! 15 मिनिटांचा वेळ वाचणार, भिडे पुलावरील काम अंतिम टप्प्यात
सर्व पहा

व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाकडून धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. दोन बीट मार्शलचं निलंबन करण्यात आलंय. तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी पुणे पोलीस आयुक्तांना याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिलेत. ड्रग्ज प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या पार्टीचा आयोजक अक्षय कामठेलाही रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune News : हॉटेलनंतर आता मॉलमध्येही ड्रग्ज; दोन पुणेकर तरुणी Drugs ओढताना सापडल्या
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल