मकरंद पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर मकरंद पाटलांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. मकरंद पाटील हे साताऱ्यातील वाई मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारीही देण्यात आली. मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री असलेले मकरंद पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मान केला. साताऱ्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तिढा आहे. शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई उत्सुक आहे. उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना आपला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर आज मकरंद पाटील यांनी उदयनराजेंची आज भेट घेतली.
advertisement
उदयनराजेंनी काय म्हटले?
यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजेंनी म्हटले की, शरद पवार हे राजकारणात महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील सीनियर आहेत. त्यांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम करायला हवे. शरद पवार हे पितृतुल्य आहेत, त्यांनी आता यापुढील पिढीला प्रोत्साहन देण्याचे काम केले पाहिजे. त्यांनी हेच करणं आता जनतेला अपेक्षित असल्याचेही उदयनराजेंनी सांगितले.
शरद पवारांकडून ही अपेक्षा नव्हती...
उदयनराजेंनी म्हटले की, सर्व मतदार म्हणजेच कुटुंब अशा पद्धतीने मकरंद पाटील हे कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीत शरद पवार उमेदवाराला पाडा, पाडा, पाडा हे वक्तव्य करतील ही मला अपेक्षा नव्हती. शरद पवारांनी मागे जे साम्राज्य उभे केले होतं, त्यांच्या पाठीशी मकरंद पाटील यांचे वडील लक्ष्मण पाटील होते. त्यामुळे मकरंद पाटलांनी काही काम केल नसतं तर मान्य होतं असेही त्यांनी म्हटले.