खरं तर मनसेचा हा दीपोत्सव दरवर्षी तरूणांच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू असतो.कारण या दीपोत्सवानिमित्त शिवाजी पार्कवर आकर्षक रोषणाई करण्यात येते. ही रोषणाई प्रत्येकालाच भूरळ पाडत असते. त्यामुळे या दीपोत्सवाला नागरीकांची प्रचंड गर्दी असते. गेल्या वर्षी या दीपोत्सवाचे उद्धाटन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळेस देवेंद्र फडवणीस देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्या काळात राज ठाकरे यांची महायुतीच्या नेत्यांसोबत अधिक जवळीकता होती.
advertisement
आता तब्बल वर्षभरानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंसोबत सर्वाधिक भेटीगाठी घेत आहेत.दोन्ही नेत्यांच्या अनेक भेटी झाल्या आहेत. या भेटीपासून दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी प्रचंड चर्चा आहे. या चर्चेत आता मनसेचा दीपोत्सवाचा मान उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्धाटन होणार आहे.या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहे.
ठाकरे बंधुसह इतर नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या भेटीआधी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह मविआचे नेते ठाकरे गटाचे कार्यालय शिवालय येथे जमले. या ठिकाणी छोटी बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्रितपणे कारमधून प्रवास केला. या वेळी ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. मंत्रालयात दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या मागे उद्धव ठाकरे आणि त्यानंतर आदित्य ठाकरे चालत असल्याचे दिसून आले.
मतदारयादीसह प्रभाग रचना आणि इतर मुद्यांवरून आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट मविआच्या शिष्टमंडळाने घेतली. दोन वेगवेगळ्या शिष्टमंडळांकडून मुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे.