TRENDING:

भाजपसोबत जोरदार राडे, उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली, ज्येष्ठ नेत्यांना सुनावलं

Last Updated:

भाजप सोबत कामगार युनियनवरून सुरू असलेल्या राड्यानंतर उद्धव ठाकरेंनी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आधी वांद्रे आणि नंतर वरळीतील सेंट रेजिसमध्ये भाजपशी झालेल्या राड्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखिल भारतीय कामगार सेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. भारतीय कामगार सेना म्हणून एकसंघ रहा, भाजपची मक्तेदारी मोडून काढा, अशा सूचना त्यांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्याचवेळी त्यांनी ज्येष्ठ नेत्यांची शाळा घेतली.
उद्धव ठाकरे (शिवसेना पक्षप्रमुख)
उद्धव ठाकरे (शिवसेना पक्षप्रमुख)
advertisement

भाजप सोबत कामगार युनियनवरून सुरू असलेल्या राड्यानंतर उद्धव ठाकरेंनी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. राज्यातील सर्व कामगार सेनेच्या युनिट्सची दुपारी १२ वाजता मातोश्रीवर बैठक संपन्न झाली. कामगार सेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी मातोश्रीवरील बैठकीसाठी हजर होते.

उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेत्यांना सुनावलं

भाजपचे मनसुबे हाणून पाडा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांच्या कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्याचवेळी भारतीय कामगार सेना म्हणून एकसंघ रहा. भारतीय कामगार सेना ही कुणाची मक्तेदारी नाही, अशा शब्दात ठाकरे यांनी ज्येष्ठ नेत्यांचे कान टोचले. कामगार सेनेच्या कामाविषयी, कामगारांच्या भल्यासाठी, त्यांच्यावरील अन्यायासाठी आपण आवाज उठवलाच पाहिजे, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

advertisement

उद्धव ठाकरे यांच्या कामगार सेनेला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दगडूशेठ बाप्पाला 21 पालेभाज्यांची आरास, चतुर्थीचा डोळ्यांचं पारणं फेडणारा Video
सर्व पहा

कामगार सेना हा शिवसेनेचा महत्त्वाचा भाग असून राज्यभरात हॉटेल्स, विमानतळ, कारखाने, कंपन्यांमध्ये सेनेचे युनिट्स आहेत. दरम्यान आता भाजपने देखील कामगार संघटना स्थापन करून उद्धव ठाकरे यांच्या कामगार चळवळीला शह देण्यास सुरुवात केलीय. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या काावर स्वतःहून लक्ष द्यायला सुरुवात केली असून आज राज्यभरातील सर्व कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेत भाजपवर शक्य तिथे पलटवार करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपसोबत जोरदार राडे, उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली, ज्येष्ठ नेत्यांना सुनावलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल