पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरातील कंकूबाई हॉस्पिटलजवळ असलेल्या शितल देवी मंदिराजवळ रस्त्यावर रात्री साडे दहाच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. शुभम फटफटवाले असं या लाडक्या भाच्याचं नाव आहे. त्याचा सोमवारी विवाह झाला होता. विवाहानंतर मोठ्या धुमधडाक्यात त्याची मिरवणूक काढण्यात आली. वरातीत पाहुण्यांचे नातेवाईकांचा लावाजमा मोठा पाहायला मिळाला. वरातीत स्पीकर लावून गाणी वरात चालली होती. वरातीत समोर महिला आणि नृत्यांगना नाचत होत्या. तर वरातीत अनेक नातेवाईक मंडळी बेधुंद होऊन नाचत होते. या वरातीत डीजेच्या तालावर बाराबाला अश्लील हावभाव करत डान्स करत होत्या.
advertisement
रात्री १० नंतरही धिंगाणा सुरूच
रात्री १० वाजेच्या नंतरही हा प्रकार सुरूच होता. डीजेच्या आवाजाचा त्रास परिसरातील नागरिकांना होत असल्यामुळे त्यातील पोलिसात तक्रार दिली. त्याचवेळी पोलीस आल्यामुळे एकच गोंधळ उडाला. मामासह वरात थेट सदर बाजार पोलीस ठाण्यात आणण्यात आली. याप्रकरणी नवरदेव, मामा, ट्रॅक्टर चालक, डीजे चालक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
भाच्याची वरात पोलीस स्टेशनात!
बेधुंद नाचणाऱ्या वऱ्हाडावर पोलिसांनी कारवाई करत नवरदेवासह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुभम फटफटवाले, मामा रवी मैनावाले, काकासाहेब जाधव, युसुफ पिरजादे, विशाल पाटील यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी लग्नाच्या वरातीतील येथील डीजे, ट्रॅक्टरसह, 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
