मागील पाच वर्षे भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने इट कळ ग्रामपंचायतीवर राज्य केले. मात्र, या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात सरपंच आणि ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराचा एक नमुना समोर आला आहे. गावाला विश्वासात न घेता, ग्रामपंचायतीने तब्बल ७ बियर बार आणि परमिट रूमला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ वाटून टाकले. यामुळे आधीच गावात अधिकृत आणि अनधिकृत मिळून २५ दारूचे अड्डे असताना, त्यात आणखी भर पडून गाव अक्षरशः ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे.
advertisement
सत्ताधाऱ्यांना दाखवला कर्तृत्वाचा’ आरसा
"गावात विकास कमी आणि बियर बारला परवानगी जास्त," असा संतप्त सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे. याच असंतोषाला वाचा फोडली ती दादा भोपळे या कार्यकर्त्याने. ग्रामपंचायतीच्या शेवटच्या ग्रामसभेच्या दिवशी, त्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयच गाठले. सरपंच आणि ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी त्यांनी रिकाम्या दारूच्या आणि बियरच्या बाटल्यांनी कार्यालयाचे प्रवेशद्वार सजवले. जणू काही ते सत्ताधाऱ्यांना त्यांच्याच ‘कर्तृत्वाचा’ आरसा दाखवत होते.