TRENDING:

Ganesh Chaturthi 2025: याला म्हणतात परंपरा आणि व्यवसायाची सांगड, पुण्यात इथं बनतात लाखो मोदक

Last Updated:

Ganesh Chaturthi 2025: कोथरूडमधील ही मोदक फॅक्टरी पुण्यातील गणेशोत्सवाच्या तयारीत महत्त्वाचा घटक बनली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: गणेशोत्सव म्हटलं की, सर्वप्रथम आठवण होते ती गणरायाच्या आवडत्या मोदकांची. पुण्यातील कोथरूड परिसरात, भारती मेढी यांनी सुरू केलेली 'मोदक फॅक्टरी' यंदा विशेष आकर्षण ठरत आहे. परंपरेसोबत आधुनिकतेची सांगड घालत त्यांनी उभारलेला हा व्यवसाय आज अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार बनला आहे. याबाबत भारती मेढी यांनी लोकल 18 शी बोलताना अधिक माहिती दिली.
advertisement

भारती मेढी यांनी काही वर्षांपूर्वी घरगुती स्तरावर मोदक बनवण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला शेजारी, नातेवाईक आणि ओळखीच्या मंडळींकडून मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांनी हळूहळू या व्यवसायाचा विस्तार केला. आज कोथरूडमध्ये त्यांनी सुरू केलेल्या या फॅक्टरीत रोज हजारो कामगार कार्यरत असून दिवसाला लाखो मोदक तयार होतात. कुटुंबातील सदस्यांचा मदतीने त्यांनी हा व्ययसाय उभा केला. दरवर्षी लाखो मोदक बनणाऱ्या त्यांच्या फॅक्टरीमध्ये त्यांनी यंदा 5 लाख मोदक बनवण्याचं टार्गेट ठेवलं आहे.

advertisement

Pune Ganoshotsav : पुण्यातील प्रसिद्ध मंडळाचा अनोखा निर्णय; गणेश भक्तांसाठी उपलब्ध करून दिलं ५० कोटींचा विमा कवच

गणेशोत्सवात वाढती मागणी

गणेशोत्सव जवळ आला की पुण्यात मोदकांची मागणी अनेक पटींनी वाढते. पारंपरिक उकडीचे मोदक, चॉकलेट, ड्रायफ्रूट्स, केशर, आमरस अशा विविध फ्लेवर्समध्ये मोदक येथे तयार केले जातात. पुण्यातील नामवंत मंडळे, घरगुती गणपती तसेच राज्यभरातून येणाऱ्या ऑर्डर्सची पूर्तता या फॅक्टरीतून केली जाते.

advertisement

शेकडो महिलांना रोजगार

भारती मेढी यांच्या या उपक्रमामुळे आतापर्यंत शेकडो महिलांना रोजगार मिळाला आहे. स्वयंपाक आणि गोड पदार्थ बनवण्याचा अनुभव असलेल्या महिला येथे काम करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक यंत्रसामग्री यांचा संगम घडवून आणल्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता तसेच वेग दोन्ही टिकवून ठेवता येत आहे.

गुणवत्ता आणि स्वच्छतेला प्राधान्य

advertisement

या फॅक्टरीत स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. दर्जेदार साहित्य, शुद्ध तूप, उत्तम दर्जाच्या तांदुळाचं पीठ आणि गुळ यांचा वापर करून मोदक तयार केले जातात. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास टिकून आहे.

भारती मेढी यांचा हा प्रयत्न केवळ व्यावसायिक उपक्रम न ठरता गणेशभक्तीचा एक भाग बनला आहे. आज कोथरूडमधील ही मोदक फॅक्टरी पुण्यातील गणेशोत्सवाच्या तयारीत महत्त्वाचा घटक बनली असून परंपरा, चव आणि उद्योजकतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganesh Chaturthi 2025: याला म्हणतात परंपरा आणि व्यवसायाची सांगड, पुण्यात इथं बनतात लाखो मोदक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल