वसईच्या सातिवलीत सातवलीत भर दुपारी दरोडा पडल आहे.तीन जणांनी घरात शिरून महिला आणि तिच्या मुलाला बांधून घरातील घरातील 10 लाखांचा ऐवज लुटून नेला. यावेळी आरोपींनी केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली आहे. चोरटे पळून जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत मात्र या इमारतीचा सुरक्षारक्षक अपंग असल्यामुळे चोरट्यांना आयतीच संधी मिळाली.
वसई पूर्वेच्या वालीव सातिवली परिसरात असलेल्या रिलायबल ग्लोरी टॉवरमधील रूम नंबर ३०१ मध्ये राऊत कुटुंबिय भाड्याने राहतात. सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास तीन अनोळखी इसमांना दाराची बेल मारली. १५ वर्षांच्या मुलाने दार उघडताच तिघे जण धक्का देत आत शिरले. त्यांनी मुलाला चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवले. त्याची आई संगिता राऊत स्वंयपाकघरात होती. तिच्यावरही चाकूने हल्ला करूत बांधून ठेवले. तिच्याकडू कपाटातील चावी घेऊन कपाटात असलेले १० लाखांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले.चोरटे पळून जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.त्यामुळे या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सूरू केला आहे.
advertisement
याप्रकरणी पोलिसांची ४ पथके तयार करण्यात आल्याची माहिती उपायुक्ता पूर्णीमा चौगुले-श्रींगी यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.
