TRENDING:

वासोटा किल्ला पर्यटनासाठी खुला, १ नोव्हेंबरपासून परवानगी, प्रवेश शुल्क किती असणार?

Last Updated:

Vasota Fort: राज्यातील गिर्यारोहक आणि पर्यटकांना भुरळ घालणारा किल्ले वासोटा पर्यटनासाठी खुला होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा: राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू अन् जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ला शनिवारपासून म्हणजे १ नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी खुला होत आहे. नैसर्गिक आपत्ती व सुरक्षिततेच्या कारणास्तव हा किल्ला गेले चार महिने पर्यटकांसाठी बंद होता. पावसाच्या उघडीपीनंतर सह्याद्रीतील पर्यटनस्थळे पर्यटनासाठी खुली झाली असून यामुळे रोजगार आणि पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे.
वासोटा किल्ला पर्यटन
वासोटा किल्ला पर्यटन
advertisement

या किल्ल्याची निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांना कायमच भुरळ पडते. सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी दिसून येते. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला वासोटा किल्ला पर्यटकांचे आकर्षण स्थान मानला जातो. शिवसागर ओलांडून कोयना अभयारण्यातून या किल्ल्यावर जावे लागते. घनदाट अरण्य, सदाहरित वृक्षराजी, अथांग जलाशयामुळे या परिसराला एक निराळे वैशिष्ट्य लाभले आहे.

किल्ल्यावरून दिसणारे निसर्गाचे रूप विलक्षण ठरते. उंचच उंच कडे अन् प्रचंड खोल दऱ्या मनात धडकी भरवतात. वासोटा पर्यटन सुरू झाल्यामुळे या भागातील मुनावळे, बामणोली, शेंबडी, तापोळा, अंबवडे येथील बोट व तंबू व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्या पर्यटन विभागाच्या आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये पर्यटनासाठी नवीन संधी उपलब्ध होत असून याचा जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी नक्कीच फायदा होणार आहे.

advertisement

पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे

वासोट्याच्या पायथ्याला पोहचल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट जंगल असल्याने सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहचत नाहीत. त्‍यामुळे सुरुवातीच्या काळात जमिनीची ओलही लवकर कमी होत नाही. परिणामी जळू (कानीट) चे प्रमाण जास्त असते. हा कीटक पायाला लागल्यावर रक्त पितो व आपोआप गळून पडतो, त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

वासोटा पर्यटन प्रवेश शुल्क असे असणार

advertisement

-१०० रुपये प्रती व्यक्ती

-१२ वर्षांच्या आत ५० रुपये

-गाईड २५० रुपये

-बोट/वाहन शुल्क १५० रुपये

-कॅमेरा शुल्क डीएसएलआर लेन्स कॅमेरा दर १०० रुपये,

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

-साधा कॅमेरा, पॉईंट शूट कॅमेरा ५० रुपये

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वासोटा किल्ला पर्यटनासाठी खुला, १ नोव्हेंबरपासून परवानगी, प्रवेश शुल्क किती असणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल