वर्धा, 11 ऑक्टोबर : हरणाच्या मटणावर ताव मारणं महागात पडलं आहे. वर्ध्यामध्ये हरणाची शिकार करून हॉटेलमध्ये मटण पार्टी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वर्ध्याच्या सावंगी परिसरात हा प्रकार समोर आला आहे. हरणाची शिकार करून मटण करणाऱ्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यातल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही दोन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
advertisement
वर्ध्याच्या आंजी परिसरातून या हरणाची शिकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. सावंगीच्या चौकातील ठाकरे किचन या हॉटेलमध्ये मटण केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हरणाची शिकार केलेला मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
October 11, 2023 7:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Wardha : हरणाची शिकार करून हॉटेलमध्ये मटण पार्टी, वर्ध्यात धक्कादायक प्रकार उघड
