गांधीवादी कार्यकर्त्या अशी करुणा फुटाणे यांची ओळख आहे. विनोबा भावे यांची चळवळ त्यांनी पुढे नेली. हयातभर विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येसाठी लढत राहिल्या. त्या सेंद्रिय शेतीच्या पुरस्कर्त्या होत्या. आज वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ग्रामसेवा मंडळाच्या परिसरातील राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं महात्मा गांधी यांच्या विचाराचा समृद्ध वारसा गमावल्याची भावना आहे.
advertisement
कृषी उद्योजकता, गोशाळा, तेलबियांचे सेंद्रिय बीजोत्पादन, शाश्वत शेती आणि महिला सक्षमीकरण यामध्ये त्याचं मोलाचं योगदान आहे. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या शेवटपर्यंत लढत राहिल्या.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
August 03, 2023 11:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या करुणा फुटाणे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन!
