जुन्या मंदिरामुळे नागटेकडी नाव
पवनार परिसरातील या टेकडीवर नागाचं जुनं मंदिर आहे. त्यामुळे या परिसराला नागटेकडी असं नाव पडलंय. हा परिसर ओसाड माळरान आहे. आता तपोवन बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून परिसरातील तरुणांनी एकत्र येत वृक्ष लागवडीचा उपक्रम सुरू केला. शनिवारी आणि रविवारी हे सदस्य नागटेकडीवर जाऊन वृक्ष लागवड करतात आणि फळझाडांची काळजी घेतात.
advertisement
ध्येयवेड्या शिक्षकाची गोष्ट, निवृत्तीनंतरही सोडवतायेत विद्यार्थ्यांच्या गणिताचं कोडं
या झाडांची लागवड
नागटेकडी परिसरात वन्य प्राणी आणि पक्षांचा विचार करून वृक्ष लागवड करण्यात आलीय. भविष्यात वन्यजीवांना, पक्षांना त्यांचा अधिवास आणि खाण्याकरिता अन्न मिळावे असा तरुणांचा उद्देश आहे. त्यासाठी नागटेकडी परिसरात आंबा, चिकू, जांभूळ, लिंब, मोसंबी, संत्रा, करवंत, सीताफळ, आवळा आदी फळझाडांची लागवड करण्यात आली. या झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी संस्थेच्या सदस्यांनी घेतली आहे.
श्रमदानातून होतेय वृक्षलागवड
संस्थेच्या माध्यमातून या वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपण मोहिमेत बहुसंख्य हात संस्थेची मदत करण्याकरीता पुढे सरसावले आहे. आठवड्यातील प्रत्येक रविवारी नागटेकडी परिसरात वृक्षलागवड आणि संगोपणाचे कामासाठी श्रमदानाच्या माध्यमातून बहुसंख्य हात एकत्र येत आहेत. या परिसरात वृक्ष लागवडीसोबतच कठडेही बसवले आहेत. सगळ्या झाडांना कठड्यांची गरज आहे त्यासाठी दानशूर व्यक्तींकडे मदतीचे आवाहनही करण्यात आलंय.
मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांचा भन्नाट उपक्रम; बागेतून घेत आहेत शिक्षणाचे धडे PHOTOS
संस्थेचा उपक्रम प्रेरणादायी
या झाडांचा फायदा माणसासोबतच पशु पक्ष्यांना होणार आहे. येणाऱ्या पिढीला या टेकडीवरील ही झाडे आनंद देणार आहेत. फळझाडांमुळे या टेकडीवर वेगळं नवचैतन्य दिसेल. त्यासाठी आजच्या काळातली तरुण पिढी मेहनत घेत आहे. संस्थेचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. म्हणूनच येणाऱ्या काहीच वर्षात ही प्रसिद्ध नागटेकडी हिरव्यागार झाडांसह विविध रसाळ फळांनीही बहरणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष राहुल खोब्रागडे सांगतात.