advertisement

ध्येयवेड्या शिक्षकाची गोष्ट, निवृत्तीनंतरही सोडवतायेत विद्यार्थ्यांच्या गणिताचं कोडं

Last Updated:

वर्धा येथील निवृत्त शिक्षकांनी अखेरपर्यंत अध्यापन करण्याचा ध्यास घेतला आहे. शिक्षक राजेंद्र मिरापूरकर हे खेडोपाडी जावून विद्यार्थ्यांना मोफत गणिताचे धडे देतात.

+
ध्येयवेड्या

ध्येयवेड्या शिक्षकाची गोष्ट, निवृत्तीनंतरही सोडवतायेत विद्यार्थ्यांच्या गणिताचं कोडं

वर्धा, 5 सप्टेंबर: विद्यार्थी आणि देशाच्या जडण घडणीत शिक्षकांचं मोठं योगदान असतं. शिक्षक समाज घडवण्याचे काम करत असतात. आज 5 सप्टेंबर रोजी देशभर शिक्षक दिन साजरा होत आहे. याच काळात अनेक शिक्षकांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा असतो. वर्धा येथील गणित शिक्षक राजेंद्र मिरापूरकर हे निवृत्तीनंतर विद्यार्थ्यांच्या गणिताचं कोडं सोडवत आहेत. गावोगावी जावून विद्यार्थ्यांना निशुल्क गणित शिकवत आहेत. ध्येयवेड्या शिक्षकाचे हे कार्य अनेक विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती घालवत आहे.
विद्यार्थ्यांना शिकवण्याचा ध्यास
राजेंद्र मिरापूरकर हे वर्धा जिल्ह्यातील झडशी येथील शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. विद्यार्थ्यांवर त्यांचा चांगलाच वचक होता. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले शिक्षण कार्य थांबवले नाही. कोणत्याही परिस्थितीत आयुष्यभर विद्यार्थ्यांना निशुल्क शिकवण्याचा ध्यास त्यांनी घेतला. प्रसिद्धीपासून कोसो दूर असलेले मिरापूरकर गुरुजी वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात जातात. तेथील 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवतात. 'शिक्षकांनी शाळेतच विद्यार्थ्यांना चांगलं शिकवलं तर वेगळ्या शिकवणीची गरज पडणार नाही, असा उद्देश असल्याचं ते सांगतात.
advertisement
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येही चालले वर्ग
विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये देखील हे गुरुजी अतिरिक्त तासिका घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करत आहेत. अनेकांना गणित हा विषय कठीण वाटतो. मात्र मिरापूरकर गुरुजी विद्यार्थ्यांना कठीण विषय सोप्पा करून देत आहेत. जोपर्यंत विद्यार्थ्यांना समजत नाही तोपर्यंत ते पिछा सोडत नाहीत. आता विद्यार्थ्यांना गणितात रुची निर्माण झाली असून विद्यार्थीही गणिताचा क्लास चुकवत नाहीत.
advertisement
अध्यापन कार्यात जपणार सातत्य
रविवार असो, सणांची सुट्टी असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो मिरापूरकर सरांचा गणिताचा अतिरिक्त वर्ग असतोच. त्यामुळे बाराही महिने गणिताचा वर्ग घेणारे शिक्षक म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नावलौकीक मिळविलेला आहे. एका शिक्षकाला एक तासिका घेणे कठीण जाते. परंतु मिरापूरकर गुरुजी एकाच तासिकेत दोन तर कधी कधी तीन तीन वर्ग घेतात. मिरापूरकर गुरुजींना गणित विषयासह इतरही शैक्षणिक उपक्रमात रस आहे.
advertisement
ग्रामीण पालक समाधानी
मिरापूरकर गुरुजींच्या गणित शिकवण्यामुळे विद्यार्थ्यांनाही गणित विषयात रुची निर्माण होऊ लागली आहे. सुट्टीच्या दिवशी असलेला गणिताचा वर्ग संपल्यानंतर गावात तसेच परगावात जाऊन पालक संपर्क वाढविला आहे. त्यामुळे बाहेरगावी नामवंत शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांनी मिरापूरकर गुरुजींच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.
advertisement
सामाजिक संस्थेकडून सत्कार
खरंतर कोणत्याही सत्कारासाठी मिरापूरकर सरांनी प्रयत्न केले नाहीत. प्रसिद्धीचीही त्यांना आवड नाही. मात्र त्यांच्या कार्याची दखल घेऊन एका संस्थेने वर्ध्यात त्यांचा सत्कार केला. फक्त निस्वार्थपणे विद्यार्थ्यांना शिकवत राहावं हा उद्देश ते साध्य करत आहेत. गणित विषयात ध्येयवेडे असलेले हे शिक्षक सप्टेंबर 2020 मध्ये सेवानिवृत्त झाले खरे मात्र आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी घडवण्याचा ध्यास त्यांनी घेतलाय. गणित विषयात विद्यार्थ्याने प्राविण्य मिळवावे या हेतूने कार्य करत असलेल्या मिरापूरकर गुरुजींचे कार्य खरोखरच प्रेरणादायी ठरतेय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
ध्येयवेड्या शिक्षकाची गोष्ट, निवृत्तीनंतरही सोडवतायेत विद्यार्थ्यांच्या गणिताचं कोडं
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement