यवतमाळ : आपण आपल्या शहरामध्ये फिरताना दररोज रस्त्यावर फिरणारे, भिक मागणारे, मनोरुग्ण पाहतो. त्यानंतर रस्त्यावर भटकणारे मनोरुग्ण कुठे जात असतील? त्यांचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार कोण करतो? त्याचे कुटुंब त्यांना का स्वीकारत नाहीत? यासारखे अनेक प्रश्न तुम्हा सर्वानाच पडत असतील. मात्र, यवतमाळ येथे संदीप शिंदे यांनी या प्रश्नांना भिडन्याचा निर्धारच केला आणि यवतमाळमध्ये नंददीप फाऊंडेशन संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून मनोरुग्णांना आधार देऊन त्यांच्यावर उपचार केले जात असून आतापर्यंत 300 च्यावर मनोरुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
advertisement
रूग्णांना कायमस्वरूपी निवारा देण्याचा प्रयत्न
संदीप शिंदे आणि त्यांच्या पत्नी नंदिनी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या नंददीप फाऊंडेशनच्या यवतमाळमधील निवारा केंद्रामुळे शेकडो मनोरुग्णांना दिलासा मिळाला आहे. काही रुग्ण बरे होऊन घरी गेले तर काहीना वेगवेगळ्या संस्थांमध्ये सोडण्याचे काम संस्थेने केलेय. संस्थेने मनोरुग्णांना केवळ अन्न वस्त्र निवाराच दिला नाही तर आता त्याच्या पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे. त्यांच्यातील हस्तकौशल्य विकसित केली आहे. कुटुंबाचा आधार तुटलेल्या मनोरुग्णांना त्याची हरवलेली ओळख पुन्हा मिळहून देण्याचे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे हे कार्य सध्या दांनशुराच्या बळावर चालू आहे. अशाप्रकारे मनोरुग्णां करीता काम करणाऱ्या नंदादीप फाऊंडेशनचं कार्य कौतुकास्पद आहे.
गर्भवती महिलांना निःशुल्क सेवा देणारे रुग्णालय; माता आणि बालकांना ठरतंय संजीवनी, पाहा Video
केविलवाण्या अवस्थेत रस्तोरस्ती भटकणाऱ्या मनोरुग्णांच्या काळोख्या आयुष्यात उजेडाचे काही कवडसे निर्माण करण्यासाठी झटणारी नंददीप फाऊंडेशन मनोरुग्णासाठी कायमस्वरूपी निवारा उभारण्याबरोबरच उपचार आणि समुपदेशन केंद्र स्वयंरोजगार लघुउद्योग केंद्र असे उपक्रम सुरू करणार आहे. त्यासाठी संस्थेला पाठबळाची आवश्यकता असल्याचं सांगितलं जातं.