संजय राऊतांच्या या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोम्या-गोम्याने बोलल्यावर मी उत्तर देत नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान अजित पवारांच्या सोम्या-गोम्याच्या या टीकेवर संजय राऊतांनी पुन्हा पलटवार केला आहे.
'त्यांचे सोम्या गोम्या दिल्लीत आहेत, ज्यांनी गुलामी पत्करली आहे किंवा जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलू नये. सोम्या गोम्या कोण आहेत 2024 ला कळेल. या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, महाराष्ट्रातले उद्योग पळवले जात असताना, महाराष्ट्राचे रोजगार पळवले जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान होत असताना सध्याच्या सरकार मधले हौसे गौसे नवशे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत, त्यांना आमच्यावर किंवा इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही. इतकं नामर्द सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या इतिहासात झालेले नाही. डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय तर फक्त आम्ही तुरुंगात जाऊ या भयाने ते लटपटत आहेत', अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
advertisement