7 दिवस पावसाचे
ऐन दिवाळीत पावसाचं विघ्न असणार आहे. इतकंच नाही तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यात 7 दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. दक्षिणे पूर्ण अरबी सागरात सायक्लोनिक सर्क्युलेशन अजूनही आहे. अरबी समुद्रापासून मध्यावर हे असल्यामुळे त्याचा दबावामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. आज कमी दाबाचा पट्टा तयार होईल. त्यामुळे वादळाचा धोका दक्षिणेकडील राज्यांना आहे. महाराष्ट्राला जरी थेट धोका नसला तरीसुद्धा हवामानात वेगाने बदल दिसून येण्याची शक्यता आहे.
advertisement
48 तासात येणार वादळ
हवामान तज्ज्ञ अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या 48 तास महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढच्या 48 तासांत कमी दबावाचे क्षेत्र तयार होणार असून ते लक्ष्यद्विपकडून पश्चिम बंगालच्या दिशेनं पुढे सरकेल. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 19 ऑक्टोबर रोजी देखील कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. तिथे हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
महाराष्ट्रात काय असेल स्थिती?
हवामान तज्ज्ञ अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी देखील मराठवाड्याचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. अति उष्णता आणि पाऊस असं दुहेरी संकट राहणार आहे. 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी पाऊस होईल. त्यानंतर उकाडा वाढेल. ऑक्टोबर हिटच्या झळा बसणार आहेत. अति उष्णतेमुळे लोक हैराण झाले आहेत. पाऊस पडून गेल्यावर जास्त गरम होत आहे. मात्र 23 ऑक्टोबरनंतर पाऊस राहणार नाही तर थंडीची चाहूल कधी लागणार याची प्रतिक्षा आहे. यंदा ला निनामुळे थंडी जास्त असेल असा अंदाज आहे.