TRENDING:

....अन्यथा तुम्ही डोळ्यादेखत मालमत्ता गमावणार! Power of Attorney चा नियम काय सांगतो?

Last Updated:

Property Rules : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या कुटुंबासह लंडनमध्ये राहत असून, त्याने भारतातील आपल्या मालमत्तेशी संबंधित कामकाजाची जबाबदारी मोठ्या भावाला विकास कोहलीला दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या कुटुंबासह लंडनमध्ये राहत असून, त्याने भारतातील आपल्या मालमत्तेशी संबंधित कामकाजाची जबाबदारी मोठ्या भावाला विकास कोहलीला दिली आहे. गुरुग्राममधील त्याच्या आलिशान बंगल्याशी संबंधित सर्व व्यवहार आता विकास कोहली पाहणार आहे. यासाठी विराटने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी (GPA) नावाचा दस्तऐवज तयार केला आहे.
property rules
property rules
advertisement

विराटच्या या निर्णयामागे प्रमुख कारण म्हणजे त्याचा भारतात न राहणं. व्यस्त क्रिकेट आणि कौटुंबिक आयुष्यामुळे तो भारतात वारंवार येऊ शकत नाही. त्यामुळे मालमत्तेशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या अधिकृतरीत्या भावाकडे सोपवण्यासाठी त्याने GPA चा अवलंब केला आहे.

काय आहे जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी (GPA)?

जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपल्या वतीने दुसऱ्या व्यक्तीस विशिष्ट कामे करण्याचा अधिकार देते. यात मालमत्ता विकणे, नोंदणी करणे, भाडे वसूल करणे, बँक व्यवहार हाताळणे, कर भरणे किंवा देखभालसंबंधी निर्णय घेणे यासारख्या अधिकारांचा समावेश असतो. तथापि, या दस्तऐवजाद्वारे मालकी हक्क हस्तांतरित होत नाही फक्त कार्य करण्याचा मर्यादित अधिकार दिला जातो.

advertisement

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, विराट कोहलीने आपल्या भावाला बंगल्याचा मालक बनवलेला नाही, तर फक्त त्या मालमत्तेची देखभाल, दुरुस्ती, कर भरणे किंवा भाडे वसुली यासंबंधी कामे करण्याची परवानगी दिली आहे.

मालकी हक्क नव्हे,फक्त अधिकृत अधिकार

सर्वोच्च न्यायालयाने 2011 मध्ये स्पष्ट केले होते की, पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे मालमत्तेचा मालकी हक्क मिळत नाही. तो केवळ एक “अधिकृत दस्तऐवज” आहे, जो मर्यादित स्वरूपात अधिकार देतो. मालकी हक्क फक्त नोंदणीकृत विक्री करार (Sale Deed) किंवा भेट करार (Gift Deed) द्वारेच हस्तांतरित होऊ शकतो. त्यामुळे GPA असलेली व्यक्ती मालकाच्या वतीने काम करू शकते, पण ती स्वतः मालमत्तेची मालक नसते.

advertisement

पॉवर ऑफ ॲटर्नी कधी आणि का उपयुक्त?

जर एखादी व्यक्ती आपल्या शहराबाहेर राहत असेल आणि त्याच्या मालमत्तेशी संबंधित कामे हाताळण्यासाठी स्वतः उपस्थित राहू शकत नसेल, तर पॉवर ऑफ ॲटर्नी अत्यंत उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, तुम्ही मुंबईत राहत असाल आणि दिल्लीमध्ये तुमची मालमत्ता असेल, तर तुम्ही विश्वासू व्यक्तीला पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे अधिकार देऊ शकता, ज्यामुळे ती व्यक्ती तुमच्या वतीने आवश्यक कामे पार पाडू शकेल.

advertisement

दस्तऐवज करताना घ्यायची काळजी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ऐन दिवाळीत मका अन् कांद्याचे दर कोसळले, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

पॉवर ऑफ ॲटर्नी करताना ती नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. तसेच, दस्तऐवजात नेमके कोणते अधिकार दिले आहेत हे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे, अन्यथा भविष्यात गैरसमज किंवा कायदेशीर वाद उद्भवू शकतात. फक्त विश्वासू व्यक्तीलाच हा अधिकार देणे हितावह ठरते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
....अन्यथा तुम्ही डोळ्यादेखत मालमत्ता गमावणार! Power of Attorney चा नियम काय सांगतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल