वंचित आघाडीने अलीकडे नगरपरिषद निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारली होती. ६ ठिकाणी नगराध्यक्ष आणि १०० पेक्षा जास्त नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे पालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने २९ महापालिकांमध्ये आपले उमेदवार उभे केले. मुंबई महापालिकेमध्ये वंचितने काँग्रेससोबत आघाडी केली. तर लातूरमध्येही काँग्रेससोबतच लढले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार वंचित आघाडीने राज्यभरात अनेक ठिकाणी नगरसेवक विजयी झाले आहे. पण ही संख्या मर्यादीत आहे. अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि सोलापूर महापालिकेमध्ये वंचितचे काही उमेदवार विजयी झाली आहे. मुंबईत मात्र भोपळाही फोडता आला नाही. वंचित आघाडीच्या ट्वीटवर मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास राज्यभरात 25 ते ३० नगरसेवक निवडणूक आल्याची माहिती आहे.
advertisement
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार वंचितची विजयी संख्या ( अंतिम अपडेट बाकी)
लातूर ०४
अकोला १४
सोलापूर ०३
छत्रपती संभाजीनगर ०४
मुंबई (BMC) ०१
MIM कुठे?
तर एमआयएमने महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेतला होता. एमआयएमने राज्यभरात ९५ पेक्षा जास्त नगरसेवक विजयी झाल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये एमआयएमने आपला जुना रेकॉर्ड कायम ठेवला आहे. एमआयएमने २४ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर मुंबईतही एमआयएमचे ८ उमेदवार विजयी झाले आहे. या व्यतिरिक्त मालेगावमध्ये एमआयएम सत्तेत आलं नाही पण जास्त जागा जिंकल्या आहे. तसंच नागपूरमध्येही एमआयएमने धडक मारली आहे.
एमआयएमने किती जागा जिंकल्या
छत्रपती संभाजीनगर २४
नागपूर (NMC) ०९
सोलापूर ०८
मालेगाव २१
मुंबई (BMC) ०३
खरंतर लोकसभा निवडणूक 2019 वंचित आणि एमआयएमने एकत्र लढवली होती. पण, एमआयएमने मतदानात मदत न केल्यामुळे वंचित आघाडीने युती तोडली होती. पण आता दोन्ही पक्षाचा आलेख पाहता वंचित आघाडी आणि एमआयएमला मिळणारी मतं ही एकगठ्ठा असली तरी त्यामुळे विभाजनाचा फटका बसत आहे. खास करून वंचित आघाडीला अनेक ठिकाणी मत विभाजनामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं. तर उलट एमआयएमला मुस्लिम बहुल भागात एकगठ्ठा मतदान मिळत आहे. त्यामुळे एमआयएमने पालिका निवडणुकीत आता वंचितपेक्षा आघाडी घेतली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
