नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. अशातच भाजप बैठकीमध्ये कुठे कुठे महायुतीत लढायचं याबद्दल चर्चा झाली आाहे. "जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे, पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असेल' असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
advertisement
नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.
'आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा विभागवार ठरवला होता. त्यामध्ये जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका याचा आढावा घेण्यासाठी हा दौरा होता. मुंबई वगळून बाकी सर्व विभागाच्या नियोजनाच्या बैठका आम्ही पूर्ण केल्या आहे.. आमच्या टीमने काय नियोजन केले, त्यांनी काय प्लॅनिंग केलाय, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना एक दिशा देणे आणि त्यांच्या तयारीबद्दल त्यांना मार्गदर्शन करणे अशा प्रकारचा हा सगळा दौरा होता. एक एका मतदारसंघाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांमध्ये प्रचंड उत्साह आहे. साधारणपणे आम्ही सगळ्यांना सांगितले आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे, पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत' असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
तसंच, 'प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं की, स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल. मात्र जिथे युती होऊ शकणार नाही, त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणी टीका करणार नाही. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केले आहे' असंही फडणवीस यांनी सांगितलं.
मुंबई महापालिका आघाड्या
'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे. तसंच महाविकास आघाडीतही ते सामील होणार, अशी चर्चा रंगली आहे. कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही. मात्र कोणीही कोणासोबत गेलं, तरी महाराष्ट्रात भाजप आणि महायुती या निवडणुका जिंकणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र आम्हाला मोठा यश येईल असा आमचा विश्वास आहे' असा दावा फडणवीसांंनी केला.
'कोणतीही योजना बंद होणार नाही'
'अंबादास दानवे नक्की शिंदे साहेबांबद्दल एक चांगला ट्वीट करण्याची इच्छा झाली, हे पण महत्त्वाची बाब आहे. कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही, सर्व योजना आम्ही चालवणार आहोत. नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे एक मोठा भार राज्यावर पडला आहे, मात्र तरीही आम्ही कुठलीही योजना थांबवलेली नाही. फ्लॅटशिप योजना मधूनही कुठली ही योजना बंद होणार नाही' असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं.