कोळी यांच्या आरोपानुसार, 12 जानेवारी रोजी रात्री 12 दरम्यान त्यांना हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर आणि महिला संघटक संस्कृती सावंत हे शिंदे गटाच्या नेत्याच्या घरून पैसे वाटत असल्याची माहिती मिळाली. तत्काळ तिथे जात कोळी यांच्या मुलीने जाब विचारला असता तिथून सगळे निघून गेल्याचं म्हटलं. मात्र पैसे टॉयलेटमधून फ्लश केल्याने पुरावा सापडला नाही असा दावा सूर्यकांत कोळी यांच्या कन्येनं केला आहे.
advertisement
या आरोपांना उत्तर देताना हरीश वरळीकर म्हणाले की शिंदे गटाचा पदाधिकारी पैसे वाटत असल्याची माहिती मिळाली म्हणुन आम्ही तिथे गेलो पण त्यांची मिटिंग सुरु होती. ना ते पैसे वाटत होते ना आम्ही पैसे वाटत होतो. कोळी नुसते आरोप करत असल्याचं वरळीकर यांनी म्हटलं.
सूर्यकांत कोळी यांच्या कान्येनं आणखी एक गंभीर आरोप हरीश वरळीकर यांच्यावर केला आहे. सूर्यकांत कोळी यांच्यावर 2017 साली एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. तो हरीश वरळीकर यांचा डाव होता, असा आरोप कोळींच्या कन्येनं केला आहे.एका महिलेला हाताशी धरून हा गुन्हा माझ्या वडलांवर दाखल केला. मात्र हा गुन्हा अजून सिद्ध नं झाल्याचं त्या म्हणाल्या. फॉरेन्सिकच्या अहवालत देखील काही आलं नसल्याचा दावा कोळी यांच्या कन्येनं केला. यावर उत्तर देताना हरीश कोळी यांनी म्हटलं की केस खोटी तयार होऊ शकत नाही. आणि अद्याप त्यांना क्लीन चिट मिळालेली नाही. गुंगचं औषध देऊन त्यांनी तो गुन्हा केला होता.
