याबाबत मिळालेली माहिती अशी की, वनिता राठोड या सायंकाळी शेतातून घरी आल्या. तेव्हा मुलगा कुणालला त्यांनी कुलर लाव असं सांगितलं. आईने सांगताच कुलर लावण्यासाठी गेलेल्या कुणालला शॉक बसला आणि त्याच्या अंगावर कुलर पडला.
शरीरसौष्ठव स्पर्धा गाजवणाऱ्या 27 वर्षीय बॉडी बिल्डरचा हार्ट अटॅकने मृत्यू; नालासोपाऱ्यातील घटना
मुलाला शॉक बसून कुलर अंगावर पडल्याचं लक्षात येताच वनिता या कुलर उचलण्यासाठी धावल्या. तेव्हा त्यांनाही कुलरचा शॉक बसला. मातीचे घर असल्यानं कुलरच्या पाण्याने जमिन ओलसर झाली होती. त्यामुळेच कुलर सुरू करत असताना शॉक बसून दुर्दैवाने माय लेकरांचा मृ्त्यू झाला.
advertisement
अर्नाळ्यात 17 वर्षीय मुलीला सर्पदंश, कुटुंबियांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
अर्नाळ्यात विषारी साप चावल्याने एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असल्याची घटना रविवारी रात्री 11 च्या सुमारास घडली आहे. संजना अशोक चव्हाण (वय 17) वर्ष असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून ही घरात झोपली असता विषारी सापाने तिच्या दोन्ही हाताला दंश केला. दरम्यान, रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने मुलीचा जीव गेला असल्याचा आरोप मृत संजनाच्या कुटुंबियांनी केला आहे.