TRENDING:

Love in Local : विरारचा रिपोर्टर, साउथ मुंबईची डॉक्टर; लोकलच्या रुळांवर धावली प्रेमाची गाडी

Last Updated:

Love in Local : लोकलच्या गर्दीत सीटवरील भांडण ते सनसनाटी बातमी; विरारचा समीर, साउथ मुंबईच्या अदितीची फिल्मपेक्षा कमी नाही लव स्टोरी

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई.... हे स्वप्नांचं शहर नेहमीच म्हटलं जातं, पण ते उगाच नाही. हे शहर कधीच झोपत नाही, स्वप्न पाहाणाऱ्याला तर ते कधीच शांत बसू ही देत नाही. ना हे शहर कधी थांबतं ना कोणाला उपाशीपोटी राहू देत. त्यामुळे हे शहर आणि येथील लोकांच्या कहाणीचे लोकांना नेहमीट अप्रुप वाटतं. लोकल ट्रेनची धावपळ, रस्त्यांवरील गोंधळ, समुद्राच्या लाटा आणि आयुष्याची वेगवान धारा इथल्या प्रत्येकाला आपल्या वलयात खेचून घेते.
Ai Generated Photo
Ai Generated Photo
advertisement

अशाच धावपळीच्या शहरात जेव्हा दोन टोकाच्या माणसांना समोरासमोर आणलं तेव्हा मात्र संपूर्ण शहर जणू काही अचानक संथ झाल्यासारखं वाटू लागलं. गुलाबी वारे वाहू लागले आणि लोकल ट्रेन जणू प्रेमाचं प्रतीक ठरलं. जेव्हा या शहरात विरारचा क्राइम रिपोर्टर समीर सावंत आणि साऊथ बॉम्बेची डॉक्टर अदिती प्रभू यांची भेट झाली.... ते ही एका लोकल ट्रेनमुळे....

advertisement

नंतर, ही भेट सतत होत राहिली आणि अखेर त्यांच्या या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं.

AI Generated Photo

Chapter 1

त्या दिवशी दुपारची वेळ होती. अदिती जी साऊथ बॉम्बेतील मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होती, तिला एका महत्वाच्या केससाठी मुंबईतील दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये लवकर पोहोचायचं होतं. कारने उशीर होईल म्हणून तिने लोकल ट्रेन पकडण्याचा निर्णय घेतला. तिला क्वचितच लोकल ट्रेनने प्रवास करायची वेळ येत असे. त्यामुळे तिला रेल्वेचे कोच किंवा त्याचे नियम याबद्दल फारसं माहित नव्हतं.

advertisement

त्या दिवशी तिने अनेक दिवसांनी ट्रेन पकडली त्यामुळे तिला लेडीज कोच आणि जनरल कोच हे काही न पहाता ती थेट जनरल कोचमध्ये चढली. विचार करायला किंवा थांबायला तिच्याकडे वेळ देखील नव्हता. मग समोर येईल तो ट्रेनचा कोच तिने पकडला.

आतमध्ये आधीच खचाखच गर्दी होती. मात्र, कुठेतरी एक सीट रिकामी दिसली आणि कोणीतरी तिथे अदितीला बसायला दिलं. पण त्या एका कृतीनं एक वेगळी कथा सुरू झाली.

advertisement

समीर सावंत, विरारचा क्राइम रिपोर्टर जो कामानिमित्त आणि कामाच्या प्रेशरमध्येच ट्रेनमध्ये चढला. तोही त्याच डब्यात उभा होता. दिवसभरातील धावपळ, सततच्या तणावानं तो आधीच चिडलेला होता. त्यात तो ज्या सीटवर बसायला जाणार असा विचार करत होता, त्या सीटवर आता अदिती बसली होती. थोडा थांबून श्वास घ्यावा किंवा डोकं शांत करावं यासाठी समीरसाठी ही सीट शेवटची संधी होती, ती ही गेली..... त्यामुळे समीर थोडा रागावला आणि चिडून तोंडातल्या तोंडातच बोलू लागला, “महिलांचे वेगळे डबे असतात, तिथं आम्ही जाऊ शकत नाही, पण तुम्ही इथे आलात की आम्हाला बसायलाही जागा मिळत नाही…”

advertisement

समीर असं बोलणारा मुळातला माणूस नव्हता. तो नेहमी सभ्य, समजूतदार असायचा. पण त्या दिवशी ऑफिसमधील ताणतणावामुळे त्याचं मन अस्वस्थ होतं आणि त्याचा परिणाम अदितीवर झाला.

अदितीला समीरचे शब्द खूप लागले. ती आधीच नवख्या गर्दीत बसलेली होती, आणि त्यात अचानक झालेल्या या तक्रारीमुळे तिला वाईट वाटलं.

तिनं लगेच प्रत्युत्तर दिलं “मी मुद्दाम इथे आले नाहीये. चुकीनं आले. पण याचा अर्थ असा नाही की मला अपमानित व्हावं लागेल.” त्यावर समीर म्हणाला, 'मला असं म्हणायचं नव्हतं, पण जाऊ देत...'. आता अदिती काही थांबायला तयार नव्हती. थोडावेळ वाद चालला आणि ते दोघे अखेर शांत बसले. ट्रेनच्या गतीने धावणाऱ्या वाऱ्यासारखा त्यांच्या शब्दांचा आदान-प्रदान देखील काही वेळा शांत झाला, पण मनातल्या भावना अजूनही हलक्याशा तणावात होत्या.

तो दिवस त्यांच्या आयुष्यातील पहिला संवाद ठरला जरी तो भांडणाने सुरू झाला असला तरी. समीरच्या रागामागे दडलेला थकवा आणि अदितीच्या मनातली खंत, हे दोघेही विसरू शकले नाहीत. लोकल ट्रेनने त्यांना एका क्षणासाठी एकत्र आणलं आणि त्यांच्या आयुष्याचा वेगवान प्रवास अचानक एका नवीन दिशेला वळला.

Chapter 2

AI Generated Photo

काही दिवसांनी समीर-अदिती समोरा-समोर आले एका अपघातामुळे, दादर फ्लायओव्हरवर एक भयानक अपघात झाला होता. ट्रकने अचानक ब्रेक, मारल्यामुळे मागून आलेल्या गाड्यांची धडाधड टक्कर… आणि रस्त्यावर भयंकर परिस्थीती उद्भवली. खरंतर ही परिस्थीती शासनाच्या चुकीच्या कामामुळे उद्भवली होती. तेव्हा त्या ठिकाणापासून समीर जवळ असल्यामुळे तो घटनास्थळी लगेच पोहोचला. समीर एका मोठ्या चॅनलचा पत्रकार होता, अगदी स्मार्ट, हुशार, हट्टी आणि निडर क्राइम रिपोर्टर.

हातात कॅमेरा आणि माईक, डोक्यात फक्त एकच विचार, ते म्हणजे "सत्य सर्वात आधी दाखवायचं."

तिथेच डॉ. अदिती प्रभू ही प्रवास करत होती, पण हा सगळा प्रकार लक्षात येताच डॉक्टर म्हणून अदिती पुढे सरसावली.

जेव्हा समीर कॅमेऱ्यात रक्ताने माखलेल्या जखमींचे फुटेज टिपू लागला, तेव्हा अदितीने संतापून म्हटले, “हे काय करताय तुम्ही? इथे महत्वाचं काय आहे माणसांची प्राण वाचवणं की कॅमेऱ्यात सनसनाटी टिपणं?”

समीरनेही मागे न हटता उत्तर दिलं ठतुमचं बरोबर आहे, मी आधीच ऍम्ब्युलन्सला फोन केला आहे आणि पोलीसही येतील इतक्यात. शिवाय मी हे जे काही करतोय ती माझ्यी ड्यूटी आहे, प्रशासनाचे डोळे खोलणंही गरजेचं आहे. मी कारतोय आणि मला काय करायचंय हे मला चांगलं माहित आहे." समीरचे हे शब्द एकदाच अदितीच्या मनात थोडा गिल्ट आला आणि तिला वाटलं की ती उगाचच समीरला खूप काही बोलून गेली. पण नंतर ते सगळं विसरुन ती जखमींच्या मदतीसाठी धावली.

जवळच्या रुग्णालयात जखमींना नेण्यात आलं तेव्हा त्या रुग्णालयात अदिती आणि समीर पुन्हा भेटले. अखेर अदितीने आज घडलेल्या प्रकाराची माफी मागितली आणि समीरनं ही ट्रेनमधील घटनेबद्दल अदितीकडे माफी मागितली. अखेर दोघांनी एकमेकांना माफ करत मैत्रीचा हात पुढे केला आणि त्यांची ही मैत्री काही दिवसांनी मैत्रीच्या नात्यापेक्षाही पुढे गेली.

Chapter 3

AI Generated Photo

समीर हा विरारचा साधा मुलगा. बालपण लोकलच्या खिडकीतून दिसणाऱ्या झोपड्या, शेतं आणि स्टेशनवरच्या गर्दीत गेलं होतं. वडील BESTमध्ये ड्रायव्हर, आई शाळेतली शिक्षिका. संघर्ष म्हणजे त्याचं दुसरं नाव. अदिती ही साऊथ बॉम्बेच्या श्रीमंतीत वाढलेली. वडील हायकोर्टात वकील, आई नामांकित आर्टिस्ट. पैशाची कधीच चिंता नाही, पण एकटेपणाची जाणीव कायम होती. हा फरक त्यांच्या बोलण्यात नेहमीच डोकावायचा.

"समीर, तुझ्या रिपोर्टिंगमध्ये खूप आक्रमकपणा असतो," अदितीने एका दिवशी म्हटलं. समीर हसून म्हणाला, "दररोज विरारहून लोकलमध्ये चार तास कोंडून प्रवास केला की आयुष्यच आक्रमक होतं, अदिती. तुला कारने हॉस्पिटल, कारने घरी… सहजचं वाटत असेल."

अदिती शांतपणे म्हणाली, "सोपं आयुष्य म्हणजे दुःख नाही असं नाही रे. या चमकदार जगातही खूप एकटेपणा असतो.” त्यांच्या ओठांवर नेहमी वाद असायचा, ते एकमेकांपासून खूप वेगळे होते, पण दोघं एकमेकांना हळूहळू समजू लागले होते.

अपघातानंतर त्यांची भेटी वाढू लागल्या. कधी कोर्टात केसच्या रिपोर्टिंगमध्ये, तर कधी गँगवारमध्ये जखमी झालेल्या पोलिसांचं इलाज करताना. समीर आपल्या रिपोर्टमध्ये अदितीचं काम कौतुकाने मांडायचा. आणि अदिती रुग्णांना म्हणायची, "जर खरं सत्य ऐकायचं असेल, तर समीर सावंतची बातमी पाहा.” हळूहळू कॉफी, मरीन ड्राईव्हवर फेरफटका… नातं जुळू लागलं. पण त्यांचं जगणं तितकं सोपं नव्हतं.

Chapter 4

AI Generated Photo

समीरला एक मोठी बातमी मिळाली की एका खासगी रुग्णालयात डॉक्टर आणि औषध कंपन्यांची संगनमत आहे. चुकीच्या बातमीत अदितीचंही नाव आलं. रिपोर्ट बाहेर आला आणि अदिती त्यात अडकली. त्यानंतर रागाणं अदिने समीरला फोन केला आणि म्हणाली “तू माझं नाव खेचून माझी प्रतिष्ठा धोक्यात घातलीस, समीर! माझं करिअर आता संपलं, मी घरच्यांना आता काय उत्तर देऊ?”

समीर शांतपणे म्हणाला, "जे पुरावे मिळाले, ते दाखवलं. माझं काम सत्य दाखवणं, मग तो कोणाच्याही विरोधात असो." काही आठवडे ते बोललेच नाहीत. पण चौकशीत अदिती निर्दोष ठरली. ही गोष्ट समीरने टीव्हीवर जाहीर केलं, "डॉ. अदिती प्रभू या पूर्णपणे निर्दोष आहेत. उलट त्यांनीच भ्रष्टाचार उघडकीस आणण्यात मदत केली." असं सांगत समीरनं त्या दिवशी सांगितल. यानंतर कुठे जाऊन समीरच्या जीवात जीव आला.

खरंतर त्याच्या रिपोर्टमुळे अदिती अडकली होती आणि त्यात अदिती निर्दोष  देखील होती. पण यात समीर काहीच करु शकत नव्हता. त्याला अदितीसाठी वाईट वाटत होतं. ती यातून सुखरुप बाहेर यावी यासाठी तो देवाकडे प्राथना करत होता.  पण जेव्हा कळालं की अदिती निर्दोष आहे, त्याने सुटकेचा श्वास सोडला आणि संधी मिळताच त्याने अदिती निर्दोष असल्याचं टीव्हीच्या माध्यमातून आवर्जून सगळ्यांना सांगितलं.

AI Generated Photo

अदितीनं जेव्हा हे पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यांत पाणी आलं. तिने हे ओळखलं की समीर कठोर असला तरी त्याचा हेतू नेहमी सत्याच असतो आणि तिनेही समीरला माफ केलं.

त्या रात्री ते दोघे ही अनेक दिवसांनी पुन्हा भेटले. त्यावेळी समुद्रकिनारी, लाटांच्या आवाजात समीर म्हणाला, "पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हा वाटलं तू साऊथ बॉम्बेची श्रीमंत, नखरेबाज मुलगी आहेस. पण आता कळलं की तू स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे जीव वाचवणारी डॉक्टर आहेस.ठ

अदिती हसून म्हणाली, "आणि मला वाटलं तू फक्त सनसनाटी पसरवणारा पत्रकार आहेस. पण खरं म्हणजे तू धैर्याने सत्य दाखवणारा माणूस आहेस."

AI Generated Photo

समीरने तिचा हात धरत हळूच विचारलं, "अदिती, माझ्यासोबत येशील? जरी मी विरारचा असलो आणि तू साऊथ बॉम्बेची असलीस तरी?" अदितीने डोळे मिटून उत्तर दिलं, "शहरांपेक्षा हृदय मोठं असतं, समीर. माझं हृदय आता तुझंच आहे."

Chapter 5

मुंबईत सीरियल ब्लास्ट आणि समीर-अदितीच्या स्टोरीला मिळालं नवीन वळण

ब्लास्टची  माहिती मिळताच समीर घटनास्थळी रिपोर्टिंगला पोहोचला, तर अदिती ही रुग्ण वाचवायला धावपळ करु लागली. दोघंही आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आणि आपल्याने जे होईल ती मदत करु लागले. समीर घडलेली घटना समोर आणण्याचा प्रयत्न करत होता. तर अदिती लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लढत होती.

धूर, किंकाळ्या, रक्त… यामध्ये दोघे पुन्हा आमनेसामने आले. समीरने एका जखमी मुलाला उचलून अदितीकडे आणलं. अदितीने ताबडतोब त्याचं उपचार सुरू केलं.

त्या दिवशी त्यांनी फक्त लोकांचे जीव वाचवले नाहीत, तर जाणलं की त्यांचं आयुष्य एकमेकांशिवाय अपूर्ण आहे.

अदितीच्या घरच्यांना विरारचा क्राइम रिपोर्टर जावई नको होता. “तो रोज धोक्यात असतो, आमच्या अदितीला सुरक्षित जीवन हवंय,” तिच्या वडिलांनी सांगितलं. समीरच्या आईवडिलांनाही शंका होती की “मोठ्या घरची मुलगी, आपल्या साध्या लोकांमध्ये ती मिसळेल का?” पण दोघांनी हे मनातून ठरवलं की हे नातं कोणत्याही परिस्थितीत टिकवायचं.

अखेर त्या दोघांनी एकमेकांसोबत रहाण्याचं ठरवल्यानंतर कुटुंबीयांना देखील त्यांचं प्रेम मान्य करावं लागलं.

लग्नानंतर अदितीने विरारमध्ये राहायला निवडलं, समीरच्या जगाचा भाग व्हायला आणि समीरने साऊथ बॉम्बेमध्ये अदितीला क्लिनिक सुरू करायला मदत केली.

त्यांचं आयुष्य अजूनही धावपळीचं आहे. कधी ब्रेकिंग न्यूज, कधी इमर्जन्सी ऑपरेशन. पण त्यांचं प्रेम प्रत्येक वादळानंतर अजून घट्ट होत गेलं.

AI Generated Photo

समीर आणि अदितीची कहाणी दाखवते की मुंबईसारख्या शहरात, जिथे आयुष्य क्षणाक्षणाला बदलतं, तिथे प्रेमही प्रत्येक क्षणाला परिक्षा घेतं. विरारचा मुलगा आणि साऊथ बॉम्बेची मुलगी दोघे अपघातात भेटले, वाद घातले, तुटले आणि पुन्हा जोडले. कारण शेवटी प्रेम म्हणजे काय? lतर नाट्यमय, संघर्षांनी भरलेलं, पण सत्य आणि माणुसकीवर उभं असलेलं एक घट्टं नातं.

नोट : “या कथेतील सर्व पात्रे, घटना, प्रसंग आणि ठिकाणे पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही वास्तविक व्यक्तीशी, जिवंत किंवा मृत, किंवा कोणत्याही सत्य घटनेशी कोणताही संबंध नाही. जर यात काही साधर्म्य किंवा योगायोग आढळला, तर तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहिली आहे आणि कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, समुदाय, धर्म किंवा ठिकाणाला दुखावण्याचा तिचा कोणताही हेतू नाही.”

मराठी बातम्या/मराठी कथा/
Love in Local : विरारचा रिपोर्टर, साउथ मुंबईची डॉक्टर; लोकलच्या रुळांवर धावली प्रेमाची गाडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल