AI Generated Photo
मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती गर्दी, मुंबई लोकल आणि ते हजारो पाय जे तिच्या पोटात ओढले जातात. धाव, धक्काबुक्की, “जरा सरका” असे कानावर पडणारे रोजचे शब्द, वडापावचा वास, पेपरवाल्याचा आवाज. सगळं रोजचं, पण रोज नवं. या रोजपणातच विनयचं आयुष्य स्थिर झालं होतं.
advertisement
विनय गोरेगावचा. दोन रूम किचनचा छोटा फ्लॅट, खिडकीतून दिसणारी रिक्षांची रांग, खाली चहा-टपरी, आणि वर घरात लावलेला तुळशीची कुंडी आई-वडील नाशिकला. तो मुंबईत एक आयटी कंपनीत काम करतो. कोड, मिटिंग, डेडलाईन या सगळ्यात त्याचं आयुष्य रमलेलं..... पण मनाच्या आत कुठेतरी एक शांत जागा रिकामी आहे. जिथे तो शब्द न बोलताही कुणाला तरी बोलावतो. त्याच्या मनात एक नाव हळूच चमकतं ते म्हणजे सिया.
AI Generated Photo
सिया ही ती तरुणी होती जिचं नाव मुळात विनयला माहित नव्हतं, त्या फक्त माहित होतं ते तिचा चेहरा, केसांना साधासा रबरबँड, डोळ्यांवर मध्येमध्ये येणारे केसांचे लट... का कानातले छोटे स्टड, आणि हातात कायम एक पुस्तकॉ. कधी मराठी, कधी इंग्रजी. ती पानं उलटताना तिच्या डोळ्यांत पडणारा प्रकाश विनयला विचित्र शांत करायचा. गर्दीचा आवाज जणू फिक्का व्हायचा.
विनय कामासाठी अंधोरीला जायचा गोरेगाव ते अंधेरी आणि अंधेरी ते गोरेगाव असं त्याचं जग. तर सिया बांद्रा ते बोरीवली असा प्रवास करायची. संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर सिया आणि विनय एकच ट्रेन पकडायचे. योगायोग म्हणजे एकच डब्यात ते चढायचे. अंधोरी ते गोरेगाव असा दोन-चार स्टेशनचा तो विनयचा प्रवास मात्र एखाद्या 3 तासाच्या सिनेमा सारखी त्याला वाटायचा.
AI Generated Photo
विनय आणि सिया एकमेकांना चेहऱ्याने ओळखायचे. पण कधीच एकमेकांशी बोलले नव्हते, ना त्यांना कोणाचं नाव माहित होतं. फक्त रोजची तोंड ओळख म्हणून ते अधूनमधून एकमेकांना पाहात स्माइल करायचे. महिनोनमहिने फक्त असंच सुरु असायचं.... एकेदिवशी सियाचं तिकीट खाली पडलं म्हणून विनयनं फक्त “अं” करून हाताने इशारा केला.... सियाला ते कळालं आणि तिने तिकिट उचलून “थँक्स” म्हणून हलक्या ओठाने म्हंटलं. या प्रसंगानंतर विनय खूप खुश झाला. काही सेकंद का होईना आम्ही बोललो असं सतत त्याच्या मनात येत होतं.
भाग 2
दिवस पुढे सरकले. महिने गेले. विनयने कालचंच धाडस आज करेन असं कितीदा ठरवलं. पण गर्दीतल्या गडबडीत, दाराजवळचा लोंढा, त्याच्या मनातल्या संकोचाचं जाळं. हे सगळं मिळून त्याला नेहमी थांबवत राहिलं. तो फक्त पाहत राहिला. कधी वाटलं हे बरोबर नाही; दुसऱ्या माणसाच्या आयुष्यात असं न बोलता घर करणं चांगलं नाही. पण मग दुसऱ्या दिवशी तिचं हसू पुन्हा त्याला त्याच जागेत आणून थांबवायचं.
AI Generated Photo
एका सकाळी मात्र वातावरण वेगळं होतं. सियाचा फोन वाजला. लगेच तिने फोन उचलला आणि ती बोलू लागली. तिच्या आवाजात एक हलकी उदासी होती, आणि शब्द साधे “हो, बाबा. पुण्याला उद्याच जाणार आहे.... चार दिवसांनी जॉइनिंग आहे, घरासाठी एका मैत्रिणीशी बोलणं झालं आहे, काळजी करु नका.... आज माझा शेवटचा लोकल प्रवास.” असं म्हणत तिने फोन कट केला.
विनयने ते सगळं ऐकलं होतं.. तेवढ्यात त्याच्या हृदयाते ठोके वाढले... शेवटचा प्रवास? म्हणजे उद्यापासून ती नाही? त्या क्षणी लोखंडी रॉड, गर्दीतला आवाज, दारात उभी माणसं सगळं त्याच्या समोरुन पुसट झालं. त्याच्या मनात अतिशय स्पष्ट एकच आवाज आला. आज नाही बोललो, तर पुन्हा कधी बोलणार नाहीस.
AI Generated Photo
तो गर्दीतून वाट काढत तिच्याजवळ गेला. फोन हातात धरुन त्याचा कोपरा शर्टाला घासत तो म्हणाला “हाय…” त्याचा आवाज गर्दीत हरवला, तरी तिच्या कानापर्यंत पोचला.
सिया थोडी चकित होऊन म्हणाली “हॅलो?”
“मी… विनय. आपण रोज या लोकलमध्ये असतो. खरं सांगतो, मी तुला रोज पाहतो. पण बोलायला कधी हिंमत केली नाही.” शब्द एकदा बाहेर पडले की पुढचं सोपं होतं. पण अनेक महिन्यांपासून प्रयत्न करुन तेच माझ्याकडू होत नव्हतं.
ती हलकं हसली. “मला माहीत आहे. तुम्ही खांबाजवळ उभे असता आणि ट्रेन थांबली की एकदा खिडकीत बघता.”
विनयला हसू आलं. ते म्हणाला “आज ऐकलं. तू पुण्याला चालली आहेस. म्हणून… मग आज बोलायचंच ठरवलं.”
सिया मान डोलावते. “हो. नवी नोकरी. मुंबई सोडायला नको वाटतंय. पण… जावंच लागेल.”
क्षणभर दोघं नि:शब्द. ट्रेनने राममंदिर स्टेशन पार केलं. दोन स्टेशनचा वेळ, जास्तीत जास्त तीन. मनात दाबलेले शब्द ढकलताना विनय म्हणाला, “तुम्ही रोज पुस्तक वाचता—‘अस्तित्व’ आवडलं होतं का?”
ती खळखळून हसली. “तुम्ही बघताच ना रोज. आवडलं. विशेषतः शेवटचं पान. ‘उद्यासाठी धडपडणारा आज’… छान आहे.”
विनय त्या हसण्यात हरवला. पण वेळ वेगात धावत होता. त्याने धैर्य एकवटलं आणि म्हणाला “जर मी उद्या तुम्हाला भेटू शकलो नाही तर? म्हणजे… संपर्क राहिला तर चालेल का?”
ती क्षणभर विचारात पडली. खिडकीबाहेरच्या इमारती मागे सरू लागल्या. “वाइट नाही. पण कारण सांगाल?”
“कारण… रोजचा हा प्रवास तुमच्यामुळे थोडा सुंदर झाला. हा सुंदरपणा हरवू नये असं वाटतं.”
ती हलकेच म्हणाली, “बरं. मग नंबर द्या.”
विनयने घाईघाईने फोन उघडला. हात घामाने ओला. तसाच त्याने तिचा नंबर घेतला आणि तिला मिसकॉल दिला. सिया... ती पुढे म्हणाली. तो पण म्हणाला मी विनय.....हे सगळं घडताना विनयला पहिल्यांदा जाणवलं, तो आज स्वतःसाठी मोठं पान पलटतोय.
गोरेगाव आलं आणि विनय उतरला.... सिया पण सिटवरुन उठली. दाराजवळ जाऊन थांबली. मग विनय उतरल्यावर त्याने मागे वळून सियाला बाय केलं. “शेवटचा प्रवास कधी कधी नवी सुरुवात ठरतो, विनय.” सिया त्याला म्हणाली.
सिया दारात उभी. लोकल पुढे सरकली, मात्र दोघांच्या हृदयात अनपेक्षितपणे एक शांत समाधान बसलं होतं, जसं उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरु होतं आणि झाडांना नवीन पालवी फुटते अगदी तसंच.....
भाग 3
AI Generated Photo
त्या रात्री विनय घरात एकटा. खिडकीतून पाऊस पाहत बसला. फोनवर सियाचा मेसेज“पुण्याला पोचलो. उद्या पहिला दिवस. थोडं टेन्शन आलंय”
विनयने उत्तर दिलं “टेन्शन नको घेऊ तुला जे जमतं ते तुझ्या पद्धतीने कर. उरलेला रस्ता आपोआप दिसतो.”
तीने ‘हसरा’ इमोजी पाठवला. मग तासभर त्यांनी छोटे छोटे मेसेज केले. पुण्यातल्या पावसाबद्दल, एफसी रोडच्या वडापावबद्दल आणि मुंबईच्या लोकलच्या उणीवांबद्दल. संभाषणाच्या पलीकडेही ही त्यांच्यात काहीतरी बनत होतं, ते म्हणजे विश्वासाचं नातं.....
दिवस गेले. विनय सकाळी लोकलमध्ये खांबाजवळच उभा राहू लागला. पण आता तिथे सिया नसायची. त्याऐवजी फोनच्या स्क्रीनवर तिचं नाव झळकत राहायचं. “आज ऑफिस भारी गेलं,” “बॉस थोडा स्ट्रिक्ट आहे,” “इथे सूर्यास्त लवकर होतो”अशा साध्या वाक्यांतून त्यांच्या दिवसांचं विणकाम सुरू असायचं
एका रविवारी ठरलं विनय पुण्याला येणार. आई-वडील नाशिकला असल्याने, त्याने आधी त्यांच्याकडे जायचं ठरवलं, मग तिथून पुण्याला उतरण्याचं ठरवलं. सियाने प्लानची लांबलचक लिस्ट पाठवली “भेळ, शनिवारवाडा, नदीकाठ.” विनयने चिडवत लिहिलं“लोकल नाहीये ना इकडे? मग मजाच काय?” ती हसली “चालत फिरू” म्हणाली.
त्या दिवशी विनय घरी गेला. त्याने घरच्यांना सियाबद्दल सांगितलं. आमच्यात आजून तरी काही नाही पण मला ती आवडते असं विनय आई-वडिलांना स्पष्टच म्हणाला.
विनयच्या आई-वडिलांनी मनोमन सियाला स्वीकारलं होतं, विनयनं फोटो दाखवताच त्यांनी ती आवडली देखील. मग
भाग 4
पुणे..... तो सकाळचा रविवार. हवेचा गारवा, रस्त्यांवर झाडांच्या सावल्या. सिया स्टेशनसमोर उभी. फिकट निळा कुर्ता, केस बांधलेले. पहिल्यांदाच त्यांची समोरासमोर, जाणीवपूर्वक भेट. शाब्दिक अंतरापेक्षा हसण्याचं अंतर कमी.
AI Generated Photo
“किती शांत शहर आहे ना?” विनयने विचारलं.
“मुंबईचं धडधडणारं हृदय मला आवडतं, पण इथे श्वास घेता येतो,” ती म्हणाली.
त्यांनी शनिवारवाड्याजवळ चालत चालत बरंच बोलणं केलं. सियाने सांगितलं, ती मैत्रिणीसोबत राहते, घर भाड्याचं आहे. नोकरीत शिकण्यासारखं पुष्कळ. “पण मी बहुतेक वर्षभर इथेच राहीन.”
“वर्षभर मोठा काळ नाही,” विनय बाहेरचा निश्चल आकाश बघत म्हणाला. “पण मनासाठी कधी कधी दिवसही मोठे असतात.”
सिया थांबली. “विनय… आपण काय आहोत?”
विनयला क्षणभर शब्द सापडेना. मग म्हणाला “आपण… जे रोज हाकेच्या अंतरावर नाही, पण भावनेच्या अंतरावर जवळ आहोत.”
ती हलकेसे हसली. “मी थोडक्यात विचारलं, आणि तुम्ही कादंबरी वाचून दाखवली.”
“मी लिहितो नुसतं मनात. शब्द बाहेर यायला उशीर होतो.” विनय म्हणाला
दुपारी भेळ, संध्याकाळी नदीकाठ. पायवाटेवर चालताना त्यांनी दोघांनी एकमेकांना वेगवेगळ्या जखमांच्या कहाण्या सांगितल्या. सियाचं कॉलेजचं प्रेम, जे शांतपणे तुटलं; विनयचे वडील, ज्यांनी त्याला कधीही ‘कमजोर’ म्हणलं नाही पण स्वतःचे अश्रू त्याच्यापासून लपवले. त्या गोष्टी दुपारच्या सावलीसारख्या त्यांच्यामागे चालून रात्रीच्या दिव्यांपर्यंत आल्या आणि तेवढ्यात जवळिकीचा अर्थ बदलला.
“कधी कधी आश्चर्य वाटतं विनय लोकलच्या दोन स्टेशनच्या अंतरात पण एखाद्याचं आयुष्य बदलू शकेल, याचो कोणी विचार केला असेल” सिया म्हणाली, “आपल्या जे आते ते खूपच फिल्मी आहे” पुढे ती म्हणाली
त्या रात्री निरोप घेताना सियाने म्हटलं, “पुढच्या वेळी मी मुंबईला येईन तेव्हा मला लोकलनंच फिरायला आवडेल, आपण तसाच काही प्लान करु ” विनय हसला. “पण हो, करुन ना..... कधी येतेस? उद्या? ” विनय म्हणाला.
भाग 5
मधल्या आठवड्यांमध्ये कामाचा दबाव वाढला. सियाचा प्रोजेक्ट फायरफायटिंगमध्ये. विनयच्या टीमला नवीन क्लायंट मिळालेलं. दिवसभर मिटिंग्स, रात्री उशिरापर्यंत काम, यामुळे दोघांमधला संवाद कमीच झाला होता. “कॉल करतो” म्हणत विनय झोपून जात असे; सिया देखील दिवसभराच्या कामाच्या ताणात अनुत्तरीत मेसेज पाहून झोपायची.
AI Generated Photo
एक दुसऱ्या दिवशी सियाने थोड्या रागाने लिहिलं “किमान ‘गुड नाइट’ तरी लिहित जा रोज.”
विनयला जाणवलं, धागा सैल झाला आहे. त्याने लगेच सियाला फोन केला आणि म्हणाल “माफ कर, थोडा कामात व्यस्त आहे. नवीन जबाबदारी आहे. उद्यापासून प्रत्येक रात्री मेसेज तरी करत जाईन प्रॉमीस.”
पण दुसऱ्याच दिवशी विनयनं प्रॉमीस तोडंलं...... त्या दिवशी त्याच्या आईचा अचानक फोन आला, वडिलांची तब्येत ढासळलेली. विनय नाशिकला गेला. सियाला त्याने कळवलं नाही, त्या रात्री सिया त्याच्या मेसेजची वाट पहाटे चार पर्यंत बघत बसली मग रडत झोपून गेली.
दोन दिवस अखेर दोघांमध्ये संवाद नाहीच... अखेर रागानं सियानेच फोन केला. फोनवर तिची चिडचिड. “तु मला काहीच सांगत नाही.”
“तू कधीच सुधरणार नाहीस बहुतेक,” विनय शांत राहून “पहिलं माझं ऐकून तर घे सिया, मग तुला मला काय म्हणायचंय ते म्हण” विनयनं सियाला घडलेला सगळा प्रकार सांगितला. मग सिया विनयला सॉरी म्हणाली, विनय ही सियाला सॉरी म्हणत म्हणाला, "पण मला तुला कळवायला हवं होतं, तुझी काळजी कळते मला." सियाने बाबाचं तब्बेत विचारली आणि मग फोन ठेवला.
तो दिवस कसाबसा गेला
तिसऱ्या दिवशी सियाने एक लांब मेसेज लिहिला. “मी दूर आहे, पण आपण आपल्यात जे काही आहे त्याला हलक्यात नको घेऊया, आपण स्पष्ट बोलू या. मला तुझी गरज आहे, पण मला ही नोकरी ही सोडायची नाही. पण. तू जिथे आहेस, तिथून मला समजून घे. मी पण घेईन.”
विनयने फोन केला. आवाज थरथरत होता. “होय. मला भीती वाटते, कारण माणसं निसटतात.”
“मग निसटू देऊ नको,” सिया म्हणाली. “घट्ट पकड. रोजचा एक फोन, दोन विनोद, आणि अधूनमधून भेट, इतकं झालं तरी चालेल मला, माझ्या काही मोठ्या मागण्या नाही. पण आपलं माणूस हवं.”
अखेर त्यांनी कसंबसं करुन आपलं नातं पुन्हा एकमेकांच्या वेळापत्रकात बसलं, पण यावेळी करारासारखं नाही, तर काळजीसारखं....
काही महिने गेले. दिवाळी जवळ आली. सिया मुंबईत आली. तीन दिवसांसाठी. विनयने ठरवलं, आज तिला लोकलनं फिरवायचं.
AI Generated Photo
“इतकी गर्दी!” सिया हसत ओरडली. “लोकल आजही तशीच.”
“लोकल कधी बदलत नाही,” विनय. “आपण बदलतो. स्टेशन आणि तिकिटाप्रमाणे.”
त्यांनी बोरिवलीतून चर्चगेटला फास्ट लोकल पकडली. दारात उभं राहून सिया बाहेर पाहत होती. “मी इथे रोज बसायचे,” ती कुजबुजली.
“मला माहीत आहे,” विनय.
“मग आज तिथेच बसू?”
“आज नाही,” तो म्हणाला. “आज आपण प्रवासात उभं राहू. कारण आपल्याला अजून थांबायचं नाही. पुढे जायचं आहे.”
सिया त्या वाक्याचा अर्थ समजून हसली.
AI Generated Photo
समुद्रकिनारी संध्याकाळी विनयने खिशातून लहानशी चांदीची अंगठी काढली. “ही महाग नाही. पण रोजच्या लोकलसारखी टिकेल,” तो म्हणाला. सिया डोळे पुसत म्हणाली, “महाग अंगठी नकोच मला. आयुष्यभराचा सहप्रवास हवा.” तीने हात पुढे केला.
त्या दिवशी मुंबईच्या वाऱ्याने थोडंसं हलकं हसून त्यांना आशीर्वाद दिला असं वाटलं.
भाग 6
नात्याला नाव आलं, तसंच जबाबदारीही. सियाला पुण्यात टीम लीडची संधी आली. विनयला मुंबईत प्रॉडक्ट मॅनेजरचा ट्रॅक दिसत होता. दोघं आपापल्या मार्गावर गंभीर. पण या सगळ्यामध्ये दोघांची महिन्याला एक भेट, रोजचा लहानसा कॉल आणि “आज काय खाल्लंस?” या अशा साध्या प्रश्नांत मोठी जिव्हाळ्याची चव हे कायम ठेवलं होतं.
दरम्यान, विनयच्या वडिलांची प्रकृती जरा सांभाळली. सियाने अनेकदा नाशिकला येऊन विनच्या आईशी वेळ घालवला होता, तीने आईला स्वयंपाकघरात मदत केली. आई म्हणायची “मुंबई, पुणे, नाशिक, तुमचं चक्र फिरतंय बघ.” सिया हसायची “लोकलची सवय आहे, आत्याबाई.”
एकदा मात्र कामामुळे विनयला गोव्याला आठवडाभर जावं लागलं. तिथे नेटवर्क नव्हता, सियाचं दिवसभरात बोलणं झालं नाही म्हणून मन घाबरलं होतं. तेव्हा जरासाही वेळ न घालवता सिया थेट गोव्याला पोहोचली. निघताना तिने विनयला मेसेज करुन ठेवसा होता.
AI Generated Photo
विनयला कळलं तेव्हा ती मडगाव स्टेशनवर तिला आणायला पोहोचला सिया ट्रेनमध्येच असताना दरवाजाजवळ तिला पाहून म्हणाला, “तू वेडी आहेस का?” तो हसला.
“हो. पण तुझ्यासाठी,” असं म्हणत ती ट्रेनमधून उत्तरली. “अचानक येणं, अचानक भेटणं,आपल्या नात्याला हेच सुट होतं.....”
त्यानंतर दोघांनी तीन दिवस गोव्यातच घालवली. त्यावेळी सियाने विनयचं काम आणि दगदग जवळून पाहिली. नातं गुलाबासारखं तेव्हा सुखरुप रहाते जेव्हा त्याचे काटे रक्षण करतात, त्यांनी हे त्यादिवशी शांतपणे मान्य केलं.
भाग 7
एक वर्ष पूर्ण.....
पुण्यात सियाचा प्रोजेक्ट डिलिव्हर झाला. कंपनीने तिला मुंबई ट्रान्सफरचा पर्याय दिला. “कस्टमर साईड कोलॅबोरेशन.” सिया आता दोन विचारात होती मनात. “मुंबईला आली तर तुझ्या जवळ असेन, पण माझं हे पुणं, इथे मी मोठी झाली, माझं शिक्षण इथे झालं, तर इथल्या रस्त्यांवर मी स्वतःला सापडले. काय करु कळत नाही.”
AI Generated Photo
विनयने तिचा हात धरला. “तुला जे शहर आपली ओळख परत देतं, ते कधीच परकं नसतं. तू जिथे सुखी असशील, तिथे मी आनंदी.”
“मग?”
“मग आपण ठरवूया. कधी मी दर पंधरा दिवसांनी पुण्यात, तू दर पंधरा दिवसांनी मुंबईत आणि या दरम्यान, तुझ्या ट्रान्सफरचा निर्णय तू घे, तो ही मनापासून. दबाव नाही.”
विनय माणूस म्हणून आणि एक साथीदार म्हणून त्यादिवशी सियासाठी काळजात घर करुन गेला. त्याच्याकडे प्रमाच्या नजरेनं पाहात “थँक यू,” ती म्हणाली. “प्रेम जे स्वातंत्र्य देतं, तेच खरं.”
मग त्यांच्या आयुष्यात एक नवा ‘रूट’ सुरू झाला, मुंबई-पुणे, वीकेंड शेअर्ड कॅलेंडर, एकाच प्लेलिस्टवर दोन शहरांची संध्याकाळ. आणि मग आला त्यांच्या कहाणीचा सर्वात महत्त्वाचा दिवस. त्यांच्या लग्नाचा नाही; त्यांच्या प्रेमाचा
AI Generated Photo
सियाने ठरवलं. “मी पुन्हा एकदा तुझ्यासोबत लोकलमध्ये प्रवास करेन. पण यावेळी शेवट म्हणजे शेवट नाही; तो आपला पहिल्या प्रवासाचा दिवस असेल.”
विनयने आश्चर्याने पाहिलं. “कसं?” सिया म्हणाली “आठवतं? मी तुझ्या आयुष्यातून निघून जाणार होते त्या दिवशी. आज मी स्वतः तुझ्या हातात हात देऊन लग्नाचा निर्णय लोकलच्या गर्दीत घेईन.”
दिवस ठरला. रविवार संध्याकाळ. गोरेगाव प्लॅटफॉर्म. दोघांनी नेहमीची लोकल पकडली. गर्दी थोडी कमी होती. सिया दारात उभी, विनय बाजूला.
ट्रेनमध्ये 'पुढील स्टेशन गोरेगाव'Xची घोषणा केली. तीच जागा, तसाच थरार. सियाने दाराच्या बाजूला टेकत हसत विचारलं, “तू तयार आहेस का?”
“कश्यासाठी?”
“माझ्यासोबत आयुष्यभर प्रवास करायला. स्टेशन बदलतील, गाड्या बदलतील, पण ‘आपण’ बदलणार नाही.”
विनयने तिचा हात घट्ट पकडला. “हो.”
त्याच क्षणी, जणू वेळ थांबला. मागच्या डब्यात कुणीतरी गणपती आरती लावली होती. पुढच्या डब्यात दोन मुलं हसत भांडत होती. गोरेगाव स्टेशना गाडी आली होतं.... स्टेशनची नामफलकं पळत पळत मागे जात होती, आणि त्यांच्या नजरेत एक स्थिरता होती. एकमेकांना दिलेला शब्द आणि ते गोरेगाव स्टेशनला उतरले.....
स्टेशनवर उतरल्यावर विनयने तिच्यासमोर छोटंसं बॉक्स उघडलं. यावेळी अंगठी सोन्याची नव्हती, पण त्यात त्यांचा दोघांचा छोटासा फोटो. कॅबिनमध्ये हसताना.
“हे काय?” सिया हसली. “तुझ्याजवळ मी नसताना, माझ्या डोळ्यातलं घर बघण्यासाठी,” तो म्हणाला. “लग्न आपण तेव्हाच करू जेव्हा तू स्वतः ठरवशील. मुंबई की पुणे की दोन्ही. मी थांबेन. कारण लोकलचे रुट्स असतात, पण जीवनाचा मार्ग आपण बनवतो.”
सियाच्या डोळ्यात पाणी आलं. “मी ठरवलंय,” ती म्हणाली. “ट्रान्सफर घ्यायची. पण कायमची नाही. प्रोजेक्ट-बेस्ड. दोन शहरं-एक हृदय. आपण एकाच शहरात राहू, पण दुसऱ्या शहरातलं प्रेम कधीही कमी होऊ देणार नाही.”
AI Generated Photo
विनयने तिचा हात आपल्या छातीवर ठेवला. “धडधडतेय?”
“खूप,” ती म्हणाली.
“मग हेच उत्तर. चल, घरी जाऊ.”