TRENDING:

आधार कार्ड संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी, नोट करा अपडेट करण्याची शेवटची तारीख

Last Updated:

आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 आहे. त्यानंतर अपडेटसाठी शुल्क लागेल. UIDAI ने फुकटात अपडेट करण्याची सुविधा बंद केली आहे. 10 वर्ष जुनं आधार कार्ड असल्यास त्वरित अपडेट करा.

advertisement
मुंबई: अगदी तिकीट काढण्यापासून ते आपलं ओळखपत्र म्हणून पटकन आधार कार्ड दाखवतो, बँकपासून ते आपल्या SIM कार्डपर्यंत आधार नंबर सगळीकडे लिंक आहे. याच आधार कार्डसंदर्भात एक मोठी बातमी आहे. आधार कार्डचा नियम बदलणार आहे. याचा परिणाम कोट्यवधी लोकांवर होणार आहे. आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख जवळ आली आहे. तुमचं आधार कार्ड 10 वर्ष जुनं असेल, त्यामध्ये काही चुका असतील तर तुम्ही या 10 दिवसात ते अपडेट करुन घ्या.
News18
News18
advertisement

याआधी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नव्हते. मात्र यापुढे आधार कार्डवरील डिटेल्स अपडेट करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील पैसे द्यावे लागणार आहेत. फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही अपडेटसाठी पैसे भरावे लागणार आहेत. त्यामुळे फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर तुमच्याकडे केवळ 10 दिवस शिल्लक राहिले आहेत.

advertisement

तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा इतर काही माहिती आधार कार्डात अजूनही अपडेट केलेलं नसेल? तर हीच योग्य वेळ आहे. कारण, 14 जून 2025 नंतर तेच अपडेट करायला तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. UIDAI फुकटात आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा आता बंद करणार आहे. 2016 पासून लागू असलेल्या नियमांनुसार, प्रत्येक आधार धारकाने दर 10 वर्षांनी आपली ओळख आणि पत्त्याचा पुरावा अपडेट करणं बंधनकारक आहे. यामुळे तुमचं KYC अपडेट राहतं आणि सरकारी फायदे, सबसिडी मिळवणं सोपं जातं.

advertisement

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, मार्कशीट, रेशन कार्डची झेरॉक्स अथवा डॉक्युमेंट जमा करणं आवश्यक आहे. पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला बँक स्टेटमेंट, गॅस बिल, वीज बिल, प्रॉपर्टी टॅक्स पावती, पासपोर्ट किंवा विवाह प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. आधार कार्डात चूक असेल किंवा माहिती जुनी असेल, तर ही मोफत संधी दवडू नका. सरकारी योजना, सबसिडी, KYCसगळं यावरच अवलंबून आहे.

advertisement

UIDAI च्या वेबसाइटवर जा, Login वर क्लिक करा, तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा टाका. तुमच्या फोनवर एक OTP येईळ तो अपलोड करा आणि लॉगइन करा. डॉक्युमेंट अपडेटचा पर्याय निवडा. आवश्यक असलेले डॉक्युमेंट अपलोड करा. सगळी माहिती तपासून सबमिट पर्याय निवडा. एकदा माहिती सबमिट केली की पुन्हा मागे जाता येत नाही त्यामुळे काळजीपूर्वक माहिती भरून सबमिट करा.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
आधार कार्ड संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी, नोट करा अपडेट करण्याची शेवटची तारीख
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल