TRENDING:

Share Market बंद होताच झाल्या मोठ्या घडामोडी, उद्या बाजारात ‘पॉझिटिव्ह शॉक’; 10 कंपन्यांची यादी बाहेर

Last Updated:

Share Market Prediction: सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी महत्त्वाचे अपडेट्स दिल्याने मंगळवारी काही स्टॉक्समध्ये मोठी हालचाल दिसू शकते. मंजुरी, मोठ्या ऑर्डर्स, LIC/RBIची गुंतवणूक आणि नव्या प्रकल्पांमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष या शेअर्सकडे राहणार आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: सोमवार 24 नोव्हेंबर रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी एक्सचेंजला महत्त्वाची माहिती दिली. मंगळवारी बाजार उघडल्यावर या स्टॉकमध्ये मोठी घडामोड दिसू शकते.

1.डॉ. रेड्डीज (Dr Reddy's)

कंपनीच्या उपकंपनीला (Subsidiary) Prolia आणि Xgeva या औषधांच्या बायोसिमिलर AVT03 साठी युरोपियन कमिशनकडून मंजुरी मिळाली आहे. कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, AVT03 हे Prolia आणि Xgeva चे प्रस्तावित बायोसिमिलर आहे. Prolia चा वापर रजोनिवृत्तीनंतरच्या (Menopause) महिलांमध्ये आणि फ्रॅक्चरचा धोका वाढलेल्या पुरुषांमध्ये ऑस्टिओपोरोसिसवर उपचार करण्यासाठी केला जातो.

advertisement

2. व्होल्टास (Voltas)

भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने एअर कंडिशनिंग आणि कूलिंग सोल्यूशन्स कंपनी असलेल्या व्होल्टासमध्ये आपली भागीदारी वाढवली आहे. सोमवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने ही माहिती दिली. एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, LIC ने व्होल्टासमध्ये अतिरिक्त 2.038 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. ज्यामुळे त्यांची एकूण भागीदारी वाढून 7.089 टक्के झाली आहे.

advertisement

3. अपोलो हॉस्पिटल्स (Apollo Hospitals)

आशियातील अग्रगण्य हेल्थकेअर सेवा प्रदाता असलेल्या अपोलो हॉस्पिटल्सने पुण्याच्या स्वारगेट येथे आपले नवीन रुग्णालय सुरू केले आहे. पीटीआयनुसार, ही सुविधा एकूण 400 बेड क्षमतेसह सुरू करण्यात आली आहे. परंतु सुरुवातीला ती २५० बेडसह टप्प्याटप्प्याने (Phased manner) उघडली जात आहे. कंपनीच्या म्हणण्यांनुसार परिसरातील वाढत्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन भविष्यात रुग्णालयाची क्षमता आणखी वाढवली जाईल.

advertisement

4. जीएमआर पॉवर (GMR Power)

जीएमआर एनर्जी लिमिटेड (GMR Energy Limited), जी जीएमआर पॉवरची 100% मालकीची उपकंपनी आहे. त्यांनी जीएमआर कलिंगा सोलर पॉवर लिमिटेड (GMR Kalinga Solar Power Limited) या नावाने एका नवीन 100% मालकीच्या उपकंपनीची स्थापना केली आहे. कंपनीने सांगितले की, या नवीन उपकंपनीची स्थापना कोणत्याही प्रकारच्या संबंधित पक्ष व्यवहाराच्या (Related Party Transaction) कक्षेत येत नाही. सोमवारच्या व्यवहारात कंपनीचा शेअर 2.95 टक्क्यांच्या घसरणीसह 122.89 रुपयांवर बंद झाला.

advertisement

5. सूर्या रोशनी (Surya Roshni)

कंपनीला Ext 3LPE कोटिंग असलेल्या स्पायरल पाइप्सच्या (Spiral Pipes) पुरवठ्यासाठी जीएसटीसह 105.18 कोटी रुपयांची नवीन ऑर्डर मिळाली आहे, अशी माहिती कंपनीने दिली. कंपनीचा शेअर सोमवारी 1.19 टक्क्यांच्या तेजीसह 260 रुपयांवर बंद झाला.

6. पारस डिफेन्स (Paras Defence)

कंपनीने इंटर-युनिव्हर्सिटी एक्सेलरेटर सेंटर (Inter-University Accelerator Centre - IUAC) (शिक्षण मंत्रालय, UGC) सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या कराराचा उद्देश कमर्शियल-ग्रेड एमआरआय मॅग्नेट सिस्टीम (Commercial-Grade MRI Magnet System) विकसित करणे हा आहे. ही भागीदारी देशातील हेल्थ-टेक आणि स्पेस-टेक क्षमतांना चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

7. हुडको (HUDCO)

कंपनीने 24 नोव्हेंबर 2025 रोजी NIUA (National Institute of Urban Affairs) सोबत एका नॉन-बाइंडिंग (non-binding) सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार, दोन्ही संस्था शहरी पायाभूत सुविधा, गुंतवणूक, UiWIN मॉडेल, क्षमता बांधणी, सेमिनार/कार्यशाळा आणि संशोधन व मूल्यांकन (Research and Evaluation) यांसारख्या क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम करतील. त्याचबरोबर, बहुपक्षीय निधी संस्थांसोबत (Multi-lateral Funding Agencies) सहकार्याच्या शक्यताही शोधल्या जातील.

8. सनटेक रियल्टी (Sunteck Realty)

कंपनीने सोमवारी (24 नोव्हेंबर) माहिती दिली की, त्यांच्या दुबईस्थित पूर्ण मालकीच्या स्टेप-डाउन उपकंपनीला स नटेक लाईफस्टाईल्स लिमिटेड (SLL) यांना लंडन कोर्ट ऑफ इंटरनॅशनल आर्बिट्रेशनकडून (London Court of International Arbitration) मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीचा जॉइंट व्हेंचर पार्टनर ग्रँड व्हॅली जनरल ट्रेडिंग एलएलसी (Grand Valley General Trading LLC) सोबत सुरू असलेला वाद आणि आर्बिट्रेशन प्रक्रिया (Arbitration process) मागे घेण्याच्या क्लेमला कोर्टाने संमती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या आदेशामुळे दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर विवादाचे निराकरण झाले आहे. ज्यामुळे समूहाला त्यांच्या व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.

9. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank)

रिझर्व्ह बँकेने (RBI) 1729 कॅपिटल (1729 Capital) आणि त्यांच्या सहयोगी संस्थांना बँकेत 7.14 टक्के भागीदारी खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. सोमवारी बँकेचा शेअर 0.96 टक्क्यांच्या घसरणीसह 139.70 रुपयांवर बंद झाला.

10. डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर (Diamond Power Infrastructure)

कंपनीला अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेड (AESL) कडून एक मोठी ऑर्डर मिळाल्याची माहिती कंपनीने सोमवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर दिली आहे. कंपनीने खावडा रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी 276.06 कोटी रुपयांचे कंडक्टर पुरवण्यासाठी अदानी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेडकडून लेटर ऑफ इंटेंट (LoI) प्राप्त केले असल्याचे सांगितले. स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, ही ऑर्डर एकूण 7,668 किलोमीटर AL-59 झेब्रा कंडक्टरच्या पुरवठ्याशी संबंधित आहे.

मराठी बातम्या/मनी/
Share Market बंद होताच झाल्या मोठ्या घडामोडी, उद्या बाजारात ‘पॉझिटिव्ह शॉक’; 10 कंपन्यांची यादी बाहेर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल