अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायद्याचं पीक
छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मशरूमची शेती फायदेशीर होऊ शकते. या मशरूम शेतीसाठी जास्त जमीन किंवा पैशांची गरज नसते. शेतकरी ही शेती घरीही सुरू करू शकतात. मशरूम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार अनुदान देते. त्यामुळे मशरूम शेती करत असाल तर जास्त फायदा मिळू शकतो. पण त्यासाठी शेती, पाणी आणि खतांचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज असते. तसे केल्यास मशरुम हे पीक अगदी दहा बाय दहाच्या जागेतही महिन्याकाठी 50 हजारापर्यंत उत्पन्न देऊ शकते.
advertisement
डाळिंब लागवड करण्याचा विचार करताय? आधी ही बातमी पाहा, Video
कशी कराल मशरूमची शेती?
आपण अवघ्या 10×10 च्या जागेमध्ये मशरूमची लागवड करू शकता. याची लागवड करणे देखील अगदी सोपे आहे. 10×10 जागेत मशरूम लागवड करण्यासाठी 500 रुपयाचे बियाणे लागतात. जवळपास 1 हजार रुपयांच्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि कार्डची गरज असते. अशाप्रकारे 30 ते 45 दिवसांत मशरूम तयार होतात. बटन मशरूम जातीसाठी 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान हवे. या मशरूम लागवडीतून शेतकरी 45 दिवसांत उत्पन्न घेऊ शकतात. लागवडीचा खर्च वगळून दीड महिन्यात 40 हजारापर्यंत नफा मिळू शकतो, असे चांडक सांगतात.
आरोग्यासाठी लाभदायी
मशरूम हे आरोग्यासाठी लाभदायी आहे. त्यामुळे मोठ्या हॉटेल, लॉजमध्ये मशरूमची भाजी आवर्जून मागवली जाते. त्याच्या डिशची किंमतही अधिक असते. तरीही आरोग्यदायी आणि शाकाहारी जेवणाचा विचार करत असाल तर मशरूमलाच प्राधान्य दिलं जातं. त्यासाठी मशरूमची मागणी अधिक असते.
मोसंबी शेतीतून वर्षाला 20 लाखांचा नफा, शेतकऱ्याने कसं कमावलं? PHOTOS
महाराष्ट्रात या मशरूमला मागणी
भारतात सर्वात जास्त बटन मशरूम या प्रजातीची लागवड केली जाते. व्हाईट बटन मशरूम ही मशरूमची एक सुधारित जात आहे. या जातीच्या मशरूमला स्वतःची सौम्य चव आहे आणि त्यात क्रीमयुक्त पोत आहे. पिझ्झापासून ते भाजीपर्यंत असं पंचतारांकित हॉटेलमध्ये याचा भरपूर वापर केला जातो. तुम्ही ते हलके वाफवून खाऊ शकता आणि कच्चे देखील खाऊ शकता. या मशरूमला भारतात जास्त मागणी आहे. त्यामुळे शेतकरी बांधव या जातीच्या मशरूमची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात, असे चांडक सांगतात.