पूर्णिया : शेती करत असताना जर शेतकऱ्याने योग्य वाण लावलं आणि चांगल्याप्रकारे काळजी घेतली तर अगदी कमी खर्चात शेतकरी चांगले पैसे कमावू शकतो, हे एका शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. वांग्याच्या शेतीच्या माध्यमातून हा शेतकरी मालामाल झाला आहे. तर मग हा शेतकरी वांग्याची नेमकी कोणती व्हरायटी वापरतो, ते बियाणं कुठून आणतो, याबाबत लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला.
advertisement
राजेश कुमार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील ठाढा गावातील रहिवासी आहेत. मागील 3 वर्षांपासून ते वांग्याची शेती करत आहेत. हे वांगे बंगालच्या व्हरायटीचे वांगे आहे. वर्षभर ही वांगी येतात. यामुळे चांगले उत्पादन होते आणि त्यामुळे ते वांग्याच्या शेतीच्या माध्यमातून चांगला नफा कमावत आहेत.
अंगणवाडी सेविकेच्या मुलाची कमाल, फक्त 10 वर्षात कमावली तब्बल 973 कोटींची संपत्ती, पण नेमकं कसं?
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, मी माझा अनुभव आणि अभ्यासाने शेती करतो. आतापर्यंत मला कधीही नुकसान झालेले नाही. तसेच प्रत्येक वेळी मी चांगला नफा कमावतो. आता शेतीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांच्या बळावरच मी माझा आर्थिक विकास करत आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, आता ते विविध प्रकारच्या हंगामी भाज्यांचीही लागवड करतात. यावेळी त्यांनी आपल्या अडीच बिघा शेतीपेक्षा जास्त शेतीत ब्लू वांगे बंगालची व्हरायटी असलेल्या वांग्याची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी बाहेरुन बियाणे मागवले आणि त्याची लागवड केली. ही शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीवर आधारित आहे.
राजेश कुमार सांगतात की, त्यांच्या शेतातील वांग्याचा आकार 12 इंचपर्यंत असतो. वांगी खायला खूप चविष्ट आणि वजनदार दिसते. वांग्याची शेती करणे इतर शेतकऱ्यांसाठी कठीण असते. जास्त मेहनत लागल्याने अनेक शेतकरी या यशस्वी होत नाही. मात्र, वांग्याची शेती करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक कीटकनाशक आणि आजारांचा प्रादुर्भाव वांग्यांवर पडू नये यासाठी वेळोवेळी औषध फवारणी करणे महत्त्वाचे आहे.
आता केमिकल टाकण्याचीही गरज नाही, फक्त हे एक काम करा, घरात अनेक वर्ष खराब होणार नाही गहू
50 हजारांच्या लागवडीत 5 लाखांपेक्षा जास्त नफा -
शेतकरी राजेश कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या शेतात दररोज वांग्यांची तोडणी केली जाते. तसेच 2 क्विंटलपेक्षा जास्त क्विंटल वांगी दररोज तोडून पूर्णिया येथील बाजारात विकली जातात. या वांग्यांना 40 ते 50 रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. त्यांना ही शेती करण्यासाठी 50 हजार रुपये खर्च आला. या माध्यमातून त्यांना यावेळी वर्षभर 5 लाखांपेक्षा जास्त 5 उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.