TRENDING:

ही अभ्यासपूर्ण शेती! 9 राज्यांमध्ये विक्री, 5-6 जणांना रोजगार, 30 लाखांची उलाढाल

Last Updated:

Agriculture business ideas: ते शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोडके, प्रतिनिधी
advertisement

सातारा : अभ्यासपूर्ण उत्पादन घेतलं तर शेतीसारखा दुसरा व्यवसाय नाही, असं म्हणतात ते काही खोटं नाही. शेतकरी एक उत्तम व्यावसायिक होऊ शकतो, हे आज राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलंय. अनेक शेतकरी बांधव वर्षाकाठी लाखो रुपयांचा निव्वळ नफा कमवतात. त्यामागे असते त्यांची प्रचंड मेहनत आणि युनिक आयडिया. साताऱ्यातील उच्चशिक्षित प्रगतशील शेतकरी श्रीकांत घोरपडे हेसुद्धा यापैकीच एक. त्यांना चक्क आयडॉल शेतकरी म्हटलं जातं, त्यांचं कार्यच तसं आहे.

advertisement

श्रीकांत घोरपडे हे सातारच्या निसराळे येथील एमबीए पदव्युत्तर. ऊस आणि कांदा पिकाचं सातत्यपूर्ण उत्पादन घेण्याबरोबरच यशस्वी उद्योजक म्हणून तरुण शेतकऱ्यांपुढे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.

त्यांनी कांद्याचं 18 टन एकरी उत्पादन घेतलं आणि रब्बी कांद्याची साठवण करण्यासाठी 25 टन क्षमतेच्या कांदा साठवण गृहाची उभारणी शेतात केली. एवढंच नाही, तर बाजारपेठेचा अभ्यास करून ते कांद्याची विक्री करतात. शेतीसोबतच त्यांनी औषधी वनस्पती आणि मसाल्याचं पीक घेण्यासही सुरूवात केली. आज ते विविध कंपन्यांना कच्चा माल पुरवतात. तसंच तयार पदार्थांचं व्यवस्थित पॅकिंग आणि ब्रॅण्डिंग करून विक्री करतात. त्यासाठी त्यांनी सरस आंत्रप्रनर्स कंपनी सुरू केली असून तिची राज्यभरात प्रसिद्धी केली आहे.

advertisement

शतावरी कल्प, लहान मुलांसाठी सत्वफल, खेळाडूंसाठी टॉनिक वीटा, शतावरी कुकीज, अश्वगंधा पावडर, शतावरी पावडर, सुंठ, हळद पावडर, लेमन ग्रास, आवळा कॅन्डी, अशी 15 हून अधिक प्रकारची उत्पादनं या कंपनीत बनवली जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते या प्रॉडक्ट्सची जाहिरात करतात. तसंच कृषी विभागाकडून आयोजित केलेल्या विविध प्रदर्शनांमध्येही ते सहभागी होतात. त्यामुळे त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला उत्तम मागणी मिळते.

advertisement

श्रीकांत यांनी आपल्या या व्यवसायासाठी सरकारी योजनांची माहिती मिळवली, त्यांचा लाभ घेतला. त्यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून अर्ज करून मशनरी विकत घेतल्या. इतर शेतकऱ्यांनाही विविध लागवडींसाठी प्रेरित केलं. ते शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे.

श्रीकांत घोरपडे यांच्या शेतात तयार केलेले प्रॉडक्ट्स आज 9 राज्यांमध्ये पाठवले जातात. त्यांच्या कंपनीत सध्या 5-6 कामगार कार्यरत आहेत. तर, कंपनीची वार्षिक उलाढाल 30 लाखांहून जास्त आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रॉडक्ट्स पर्यावरणपूरक असल्यानं त्यांना मोठी मागणी मिळते, आता ते सातासमुद्रापार पोहोचवण्याचं स्वप्न श्रीकांत घोरपडे यांनी पाहिलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/कृषी/
ही अभ्यासपूर्ण शेती! 9 राज्यांमध्ये विक्री, 5-6 जणांना रोजगार, 30 लाखांची उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल