पुणे: 'स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कतृत्व', असं नेहमी म्हटलं जातं. सध्याच्या काळात अशा सुपर वूमन विविध क्षेत्रात आपण पाहिल्या असतील. पुण्यात अशीच एक महिला शेती क्षेत्र गाजवतेय. पुण्यातील भोर तालुक्यातील बालवडी या ठिकाणच्या प्रगतशील शेतकरी स्वाती किंद्रे यांनी पारंपरिक शेतीला बगल दिली आणि 30 गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊस उभारलं. याच पॉलिहाऊसमध्ये जरबेरा फुलवला असून त्यातून त्यांना लाखोचं उत्पन्न मिळत आहे.
advertisement
कसे केले नियोजन?
स्वाती किंद्रे यांचे पती अमित ज्ञानेश्वर किंद्रे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यरत आहेत. त्यांनी नगदी शेती करण्यास प्रोत्साहित करुन न थांबता शेतीला लागणारे पॉलीहाऊस तयार करून घेतले. या परिसरात रासायनिक खते, औषधे, योग्य तण नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, बुरशीनाशक आणि किड नियंत्रण, सेंद्रिय जिवाणू खतांचा वापर आणि उत्पादित फुलांना बाजारपेठेचे सुयोग्य नियोजन केले. नैसर्गिक पध्दतीने जरबेरा या नगदी पिकाचे भरघोस उत्पादन काढले. त्यामुळे हुकमी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाले आहे.
Success Story : पतीच्या निधनानंतर खचून न जाता सुरु केला फुड्स गृह उद्योग; महिलेची लाखोंची कमाई
जरबेराची लागवड
पूर्व मशागतीमधे लाल माती, दीड टन भाताची तुस, 25 ट्रॉली शेणखत मिसळले. ट्रॅक्टरने नांगरट करून रोटर मारला. पाणी सोडल्यानंतर दोन दिवसांनी बेड तयार करून राईस अन् शाईन जरबेरा वाणांची 18 हजार रोपांची लागवड केली. शेतीची आवड असल्याने पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे लक्ष केंद्रित केले. सध्या सण, उत्सव, लग्न यांची रेलचेल आहे. या कार्यक्रमांत फुलांना मोठी मागणी आहे. हे पीक वर्षभर येत असल्याने आर्थिक उत्पन्नाचे चांगले माध्यम आहे, अशी माहिती स्वाती किंद्रे यांनी दिली आहे.
पुण्यात पिकतोय चक्क निळा तांदूळ, पाहा कशी होतीय शेती PHOTOS
जरबेरातून लाखोंची कमाई
स्वाती किंद्रे यांना जरबेरा शेतीतून चांगला नफा मिळत आहे. जरबेराची 300 गड्डी फुले रोज पुण्यातील गुलटेकडी फुल मार्केटला पाठवली जातात. यासाठी 20 रुपयांपासून ते 90 रुपयांपर्यंत गड्डीला भाव मिळत आहे. त्यामुळे केंद्रे यांना लाखोंचा नफा मिळत आहे. आत्ताची स्त्री ही स्वतंत्र असून ती सक्षम देखील आहे. शिक्षणाच्या जोरावर विविध क्षेत्रात बाजी मारत असल्याचं देखील आपल्याला दिसतंय. ज्या स्त्रिया आयुष्यात काहीतरी करण्याची स्वप्न पाहत आहेत त्यांच्या साठी स्वाती किंद्रे या नक्कीच आदर्श आहेत.