जालना: केंद्र सरकारने 4 जानेवारी रोजी हमीभावाने तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुरीच्या भावामध्ये प्रतिक्विंटल एक हजार रुपयांची वाढ दिसून येत आहे. नवीन तुरीची आवक सुरू झाल्यानंतर तुरीच्या भावामध्ये घसरण पाहायला मिळाली होती. सर्वसाधारणपणे तुरीचे भाव 7 ते 8 हजार 500 च्या दरम्यान होते. मात्र घटलेले उत्पादन आणि हमीभावाने सुरू झालेली खरेदी यामुळे तुरीच्या दरात तेजी आहे. जालना येथील बाजारात 9 हजार 500 ते 10 हजार 500 च्या दरम्यान तुरीचे दर आहेत. या दरामध्ये आणखी वाढ होऊन 11 ते 12 हजारांच्या दरम्यान ते जाऊ शकतात, असा अंदाज बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे स्वस्त तुरडाळ खरेदी करायला मिळेल ही ग्राहकांची अपेक्षा फोल ठरली आहे.
advertisement
मिरची लागवड केली आणि बदललं शेतकऱ्याचं नशीब; आता लाखोंची कमाई PHOTOS
लोकसभा निवडणुकीनंतर तेजी?
देशातील जनतेच्या आहारातील मुख्य घटकांपैकी तूरडाळ हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तुरीच्या वाढलेल्या भावाचा परिणाम तूर डाळीच्या भावावर सहाजिकच होत असतो. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज अडीच ते साडेतीन हजार पोते तुरीची आवक होत आहे. ही आवक मागील वर्षाच्या तुलनेत निम्मी आहे. येत्या मार्च, एप्रिल महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत तुरीच्या भावात फारशी वाढ होणार नाही. मात्र, जून-जुलै महिन्यामध्ये तूर 14 ते 15 हजारांचा टप्पा ही पार करू शकते, असा अंदाज जालन्यातील व्यापारी संजय कानडे यांनी व्यक्त केलाय.
दुष्काळी शेतकऱ्यांचा अनोखा फंडा, 2 महिन्यांच्या सिझनमध्ये एकरी दीड लाखांची कमाई, Video
सर्वसामान्यांची निराशा होणार
यंदा परतीचा पाऊस न झाल्यामुळे तुरीच्या उत्पादनामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. त्यात सुरुवातीला तुरीचे बाजार 8500 ते 9500 होते. परंतु केंद्र सरकारने तुरीची खरेदी करण्याची घोषणा करताच हजार रुपयांचे वाढ झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना तुरीची डाळ आपल्याला स्वस्त खायला मिळेल ही आशा होती. परंतु ती आशा फोल ठरत आहे. यंदा लोकसभा निवडणुका असल्यामुळे तुरीचे बाजार सध्या तरी वाढण्याची शक्यता नाही. कारण तुरीची डाळ महाग झाल्यास जनता सरकारवर ओरडेल त्यामुळे जून, जुलै, ऑगस्ट नंतर हजार ते पंधराशे रुपयांची तेजी येईल, असेही कानडे सांगतात.